केमन आयलंड इथे मातृभूमीचा ठसा उमटवणाऱ्या शिल्पा तागलपल्लेवार !


कुठेतरी असं वाचलं होतं एखादी वेगळी गोष्टं करता येत नसेल तर साधीचं गोष्टं वेगळ्या पद्धतीने करून पहा .
हे अगदी असंच शिल्पा तागलपल्लेवार ह्यांनी केलं .
शिल्पा मूळ चंद्रपूरच्या कला आणि वाणिज्य शाखेच्या द्वि पदवीधर . वयाच्या २६ व्या वर्षी त्याचं लग्न झालं.लग्नानंतर सिरामिक ,रांगोळी ,पेंटिंगचे आर्ट क्लासेस त्या घ्यायच्या त्याच बरोबर चित्रकलेची इंटरमीडीयेट परीक्षा त्यांनी दिली ती लग्ना नंतरच ! मिस्टरांच्या नोकरी निमित्त .साधारण २००९ साली शिल्पा केमन आयलंड
इथे स्थायिक झाल्या.हे एक कॅरिबियन बेटआहे . नवा देश ,नवी भाषा नोकरी मिळणं
Shilpa gifting her painting to Prince Charles
तसं शिल्पासाठी अवघडच होतं .संधीची वाट बघण्या पेक्षा आपण संधी निर्माण केली पाहिजे असं शिल्पा ह्यांच मत आहे .लहानपणापासून चिकाटी वृत्ती आणि कलेची आवड असल्यामुळे शिल्पाने इथे आपली कला जोपासायला सुरवात केली .सुरवातीला त्यांनी विनामोबदला काम केले आणि २०१३ साली त्यांना अखेर तिथे काम करण्याचा परवाना मिळाला .त्या केमन आयलंड इथे असलेल्या एकमेव हिना आर्टटीस्ट आहेत .व्हाईट हीना ही त्यांची खासियत आहे.
केमन आयलंड इथे मंदिर बांधायला परवानगी नाही ,शिल्पा ह्यांनी इथे अनेक भारतीय उत्सव साजरे करायला सुरवात केली .आत्ता केमन आयलंड
इथे गणेश उत्सव ,दिवाळी ,होळी उत्साहात साजरे होतात .
कॅनव्हास पेंटिंग,कॉफी आर्ट,chalk आर्ट ,तिथल्या नाटकाचे सेट बनवणं ,रांगोळीला पर्याय म्हणून बारीक वाळूत रंग मिसळून रांगोळी बनवणे अशा विविध गोष्टी त्या करत असतात . केमन आयलंड इथे त्यांनी हौस म्हणून आणि भारताची आठवण म्हणून घरा समोर छोटे तुळशी वृंदावन बनवलेलं आहे .भारताचं आणि आपल्या संस्कृतीचं प्रेम इथेच थांबत नाही तर त्या त्यांच्या इतर परदेशी मैत्रीणीना हौसेने आपल्या पद्धतीचं जेवण खाऊ घालत असतात त्याच बरोबर शिकवत ही असतात .
.शिल्पा ह्यांना असंख्य कला पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे . एका कार्यक्रमा दरम्यान शिल्पा ह्यांना प्रिंस चार्लेसला भेटण्याचा आणि त्यांनी साकारलेलं पेंटिंग गिफ्ट करण्याचा योग आला .
अशा ह्या शिल्पा तागलपल्लेवार परदेशी आपल्या मायदेशाचा एक ठसा उमटवून ठसठशीत पणे उभ्या आहेत .
मला त्यांचा खूप अभिमान वाटतो.

Related Posts

One thought on “केमन आयलंड इथे मातृभूमीचा ठसा उमटवणाऱ्या शिल्पा तागलपल्लेवार !

Comments are closed.