२०२० साली मी काही फिल्ममेकर्स सोबत संवाद साधला, तेव्हा मला जाणवलं की बर्याच फिल्ममेकर्सच्या संघर्षाच्या गोष्टी जवळजवळ सारख्याच आहेत. सिनेमा ही एक कला आहे, बरेच लोकं ह्या दृश्यात्मक कलेच्या ग्लॅमरकडे आकर्षित होतात आणि स्वताचा चित्रपट, लघुपट बनवण्याचा प्रयत्न करतात. ओटीटी सारखे व्यासपीठ उपलब्ध झाल्यामुळे, इंटरनेटमुळे प्रत्येक गल्लीत एकतरी उभारता फिल्ममेकर दिसेल, पण फिल्म स्कूल्सचे प्रमाण कमी आहेत.
आज मी, शेखर बापू रणखांबे यांच्या सिनेमाच्या क्षेत्रातील प्रवास येथे तुमच्यासमोर मांडत आहे. मी त्यांची कहाणी निवडली कारण त्यात अनेक फिल्ममेकर्सच्या संघर्षाच्या गोष्टींचे तुकडे सापडले .
नमस्कार, मी शेखर बापू रणखांबे, माझा जन्म आणि संगलीतील तासगाव तालुक्यातील पेड गावी झाला,म्हणून मी माझ्या प्रोडक्शनला पेड फिल्म्स असे नाव दिले. माझं १२ वी पर्यंत पेड मध्ये शिक्षण झालं,१२ वी नंतर मी मुंबईला आलो . आमच्या गावात तमाशाची परंपरा आहे .त्यामुळे मला तमाशाचं आकर्षण आहे . जर मी सिनेमात नसतो तर तमाशात असतो .
मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला वाटायचे की तमाशा कलाकारांना फारसा आदर दिला जात नाही. म्हणून मला असे वाटले कदाचित चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा खूप आदर केला जात असेल , म्हणून फिल्म इंडस्ट्रीचा भाग होणं हे माझं स्वप्न झालं, शाळेत मी स्नेहसंमेलनात भाग घ्यायचो .
एकदा मी एका मासिकात वाचले होते, दादा कोंडके यांनी फक्त सातवी पर्यंत शिक्षण घेतले होते, हे वाचल्यावर माझ्या मनात एक विचार आला, “मी बारावी उत्तीर्ण झालो आहे, मी ही काही करू शकतो आणि 2004 मध्ये मी मुंबईला आलो.” तेव्हा पोटापाण्याचा प्रश्न होता, त्यामुळे मी आधी कामाला लागलो.१ वर्ष माझं नाट्यगृह लांबून बघण्यात गेलं, .
2006 मध्ये मी ‘सही रे सही ‘ नाटक पाहिले आणि नाटक पाहिल्यावर मी स्वत: ला प्रश्न विचारला, “माझं स्वप्न अभिनय करण आहे, मी का थांबलो आहे? मी सुरुवात केली पाहिजे.” नशीब माझ्या बाजूने होते, माझा संतोषचा मित्र चौळकर एक उत्तम शिल्पकार आहेत. तो एका नाटकाचा एक भाग होता. त्याच्या कारखान्या बाहेर त्या नाटकाचे पोस्टर लागले होते. मी नाटका विषयी चौकशी केली. मग त्याने मला विचारले “तुला नाटकात काम करायचे आहे का?” मी “हो” असे उत्तर दिले. ‘राज्य नाट्य स्पर्धा’ मध्ये हे नाटक सादर होणार होते. नाटकातील काही कलाकार इतर कामात व्यस्त होते म्हणून मला पर्याय म्हणून अभिनय करण्याची संधी मिळाली आणि माझा प्रवास सुरू झाला. मी नाटक ही लिहू लागलो. मी लिहिलेल्या नाटकात बरीच पात्रं असायची पण त्यावेळेस ट्रेंड १-२ पत्रांचा होता, मग मी कमी पात्र असलेले नाटक लिहिले आणि ट्रेंड बदलला,मग मी ट्रेंड अनुसरण करणे बंद केले.
जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हा मी फकीरा कादंबरी वाचली. तोपर्यंत मी एकही कादंबरी वाचली नव्हती.मी स्वतःचे अनुभव लिहायचो आणि माझ्या मित्रांना दाखवायचो, माझ्या मित्रांना ते वाचायला आवडायचे . मी अनेकांना मी माझ्या कथा ऐकवायचो, तेव्हा माझ्या कथेत रोजच्या जगण्यातली सायकॉलॉजी दिसते असं सगळे म्हणायचे पण मला सायकोलॉजी म्हणजे काय हेच माहिती नव्हतं.मी माझ्या कथा चोरल्या आहेत, अशी लोकांना शंका होती, कारण माझे शिक्षण फक्त बारावी होते. म्हणून मी पुढील अभ्यासासाठी प्रवेश घेतला, लवकरच मी पदवीधर होईल. मेन स्ट्रीम मध्ये 5-6 वर्षात एक लक्षात आलं, माणस नकारात्मक बोलतात. तिथे लक्ष न देता आपण स्वतः काम केलं पाहिजे .
2008 मध्ये मला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून अण्णासाहेब पाटील, द ग्रेट माथाडी (बायोपिक) साठी संधी मिळाली. मला खर तर अभिनय करायचा होता पण माझ्या लक्षात आलं ह्या स्पर्धेत आपला निभाव लागण कठीण आहे,मग मी दिग्दर्शनावर लक्ष केंद्रित केलं. मी माझ्या लघुपटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली.

शेखर बापू रणखांबे ह्यांच्या लघुपट निर्मिती दरम्यानचे काही अनुभव :
चिमणराव : साधारण 2004 ते 2012 दरम्यान चिमणराव हा लघुपट बनवला. त्यावेळेस चिमण्यांची संख्या कमी झाली होती. मी माझ्या गावी गेलो होतो. आमच्या घरी रोज एक चिमणी येयची , ती कुटुंबातील सदस्यांजवळ जायची . सामान्यत: चिमण्या माणसांजवळ जात नाहीत, असं म्हणतात की तुम्ही एखाद्या चिमणी जवळ गेलात तर बाकीच्या चिमण्या तिला ठार मारतात, मग मी विचार करू लागलो, “ही चिमणी आमच्या घरात कशी येते?” ती खंगलेल्या अवस्थेत होती, मला तिच्याबद्दल वाईट वाटले, मला वाटले की काहीतरी केलं पाहिजे. माझ्याकडे एक छोटा कॅमेरा होता. मी तिचे शॉट घेतले, मग मी एक कथा तयार केली. मी स्वतः लघुपटात अभिनय केला, एडीट केलं. मी सायकलला कॅमेरा बांधायचो, कधीकधी मी झाडावर कॅमेरा लटकवायचो आणि पुढे जाऊन अभिनय करायचो.मग मी कॅमेर्यात घेतलेला शॉट पहायचो . मग चुकलं असेल तर मी शॉट्स रीटेक करायचो. अशा प्रकारे मी एकट्याने चिमणराव पूर्ण केला.

धोंडा : माणुस आणि दगडरुपी देव समोरासमोर जेव्हा उभा ठाकेल त्यावेळेस आपण कशाला महत्त्व द्यायचं?दगडातल्या देवाला की माणुसकीला ह्यावर आधारित धोंडा आहे.धोंडा लिहून मी गावात परतलो, शूट जरी माझ्या गावात असलं, तरी चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी आम्हाला अर्थकारणाची गरज होती, मुंबईहून एक टीम आणली गेली असती तरी ते अधिक खर्चिक होते म्हणून मी माझ्या गावातल्याच कलाकारांना कास्ट केले. मी त्यांची 4 दिवस कार्यशाळा घेतली. चित्रपटाच्या पोस्ट-प्रॉडक्शनसाठी मला माझ्या दोन जिवलग मित्र दीपक जौल आणि अभिषेक म्हैस्कर यांच्याकडून आर्थिक मदत मिळाली. त्यांनी मला मदत केली आणि पोस्ट-प्रॉडक्शन झाले. धोंडाच्या स्क्रीनिंगनंतर लोक मला ओळखू लागले.
मूक : मूक साकारताना खूप अडचणी आल्या,शूट बर्याचवेळा रद्द झाले, कधीकधी मुलाला (हुझेफ कुरेशी) योग्य कपडे मिळत नव्हते, कधी लोकेशन उपलब्ध नव्हते. शूटच्या दिवशी माझ्याकडे पैसे नव्हते, माझा मित्र शंकर पवार यांनी मला 500 रुपयांची मदत केली आणि शूटिंग दोन दिवस झाले. चित्रीकरण स्टोर करण्यासाठी माझ्याकडे कोणतीही हार्ड ड्राईव्ह नव्हती. आमच्या सिनेमॅटोग्राफरच्या लॅपटॉपवर फिल्म सेव्ह होती , माझी एक बहिण आहे तिने तिचे सोन्याचे कानातले मला दिले आणि म्हणाली तू आधी तुझी हार्डड्राईव्ह घे, नंतर कळलं लॅपटॉप मध्ये वायरस आहे. ज्यावेळेस मला कळालं वायरस आहे तेव्हा मला चालता चालता रडायला आलं कारण मी सहा महिने ह्या कलाकृतीवर घालवले होते. पण सुदैवाने सगळ्या फाइल्स नीट होत्या.दीपक ने एडिटिंग करून दिलं , त्याचा सगळा फोल्ली साउंड हा मोबाईलवर केला आहे. डबिंग हे लॅपटॉप वर केले आहे.ही फिल्म फेस्टिवलला पाठवली त्याला अवार्ड मिळाले.त्याच्या लेखनाला ॲप्रिसिएशन मिळाले मग आनंद झाला.

पॅम्फलेट फिल्म लिहिल्यानंतर, मी गावात परतलो. निर्माता आर्थिक अडचणीत सापडला होता, चित्रपटाचे शूटिंग 4 दिवसांनी होते, ही एक कठीण परिस्थिती होती. मला गावातले माझे मित्र जितू आणि अतुल आणि एका बहिणीकडून आर्थिक पाठिंबा मिळाला. चित्रपटाचे शूटिंग वेळेवर पूर्ण झाले. आर्थिक अडचणींमुळे पोस्ट-प्रॉडक्शन थांबले होतेे. मी पॅम्फलेट लघुपट बनवला, तोपर्यंत मला मार्केट समजले होते, अंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हे माझे लक्ष्य झाले. मला चांगल्या प्रतीचा आवाज हवा होता, डॉ शाहू ओंकार पुढील चित्रपट निर्मितीसाठी तयार झाले. हे काम पूर्ण करण्यास दीड वर्षाचा कालावधी लागला. आपल्या कधीतरी असे पॅम्फलेट मिळतात ज्यात एक चमत्काराची कहाणी सांगितलेली असते आणि त्यात त्या पॅम्फलेटच्या आणखी प्रती छापून वितरित करण्यास भाग पाडले जाते आणि तसं न केल्यास काही वाईट घडेल ही भीती पसरवली जाते, ह्या अंधश्रद्धेमुळे होणार्या मानसिक अपंगत्वावर आधारित पॅम्फलेट आहे.इंडियन पॅनोरामा विभागात, २०१८ साली इफ्फीसाठी याची निवड केली गेली होती आणि असंख्य चित्रपट महोत्सवात ‘पॅम्फलेट’ ने प्रथम व द्वितीय पारितोषिकं जिंकले आहेत.ह्यांचे विशेष स्क्रीनिंग मोठ्या संख्येने घेण्यात आली
कबुतरं : मधल्या काळात मला काम खूप प्रमाणत येयचं. अनेकांना माझ्या गोष्टी आवडायच्या. पण प्रोड्युसर समोर ते नीट प्रेसेंट करता यायचं नाही..ह्या काळात सैराट चित्रपट प्रदर्शित झाला होता.सैराट नंतर खूप साऱ्या लव स्टोरीज बनवण्याचा ट्रेंड आला . सगळे लोकं लव स्टोरी करत सुटलेले, मला पण वाटलं माझ्याकडे पण खूप लव्हस्टोरीज आहेत, निर्माता भेटत नाही. मग आपण पण लव स्टोरीज करूयात. मग सात वेगवेगळ्या लव्ह स्टोरीजची मिळून कबूतर ही वेब सिरीज बनवायची असे ठरले. एका स्टोरीचे 4 एपिसोड असणार हे ठरले . .त्यात गावातलीच लोकं ज्यांना ॲक्टींगची आवड आहे, अशी लोकं तयार करूयात असा विचार केला.पण कबुतरं करायचं म्हणजे कमीत कमी जेवण देता येईल इतके तरी किमान पैसे हवेत, फिल्म बनवण्याचे इक्विपमेंट हवे , मग स्पॉन्सरचा शोध घेऊ लागलो. आम्ही टीजर्स बनवले आणि सोशल मिडियावर वायरल केले पण स्पॉन्सर न मिळाल्यामुळे कबूतरं वेबसिरीजचे काम थांबले, त्यावेळेस कोरी पाटी प्रोडक्शनचे नितीन यांनी वेबसिरीजसाठी विचारले आणि कोरी पाटी प्रोडक्शन तर्फे कबुतरं वेबसिरीज करायला तयार झालो ..माझा मुख्य उद्देश लोकांना मी कमर्शियल सिनेमा करू शकतो हे कामातून दाखवून द्यायचे होते, त्याच बरोबर मला माणसेही जमवायची होती.कबुतरं आल्यानंतर सिनेमॅटिक इफेक्ट असलेल्या सिरीज युट्युब वर होऊ शकतात. हे लोकांना लक्षात आलं, तोपर्यंत बऱ्यापैकी शॉर्ट फिल्म साध्या होत्या.कोरी पाटीची गावाकडच्या गोष्टी ही सिरीज बंद होऊन कबुतरं येणार होती. पण हे स्वीकारायला प्रेक्षक तयार नव्हते .९५ % निगेटिव्ह कमेंट्स येयच्या .पण पहिला एपिसोड आल्यानंतर त्याच कमेंट्स पॉझिटिव्ह झाल्या.
हाऱ्या-नाऱ्या: जेव्हा हाऱ्या-नाऱ्या वेब सीरिजचा विचार केला तो पर्यंत हे कळले होते निर्माता मिळणे अवघड आहे विशेष करून आपण प्रस्थापित नसू तर. लॉकडाऊनमुळे कलाकारांची आर्थिक परिस्थिती नाजूक बनली होती . डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्यांची कमाई ठीकठाक चालली होती. म्हणूनच मी वेब सीरीज तयार करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे खेड्यातल्या अनेक कलाकारांना संधी मिळेल आणि व्यवसाय, नोकरी करण्याऐवजी माझ्या आवडीच्या क्षेत्रातून अर्थकारण मी मिळवू शकेल. लोक यूट्यूबवर अधिक काय पाहतात? याचा अभ्यास केला, त्यानंतर मला समजले की ग्रामीण लोकांना रोजच्या जगण्यातल्या साध्याच गोष्टी आवडतात, साध्या गोष्टींचा ते आनंद घेतात, हाऱ्या-नाऱ्या: ही पात्र लोककलेतील प्रसिद्ध पात्र आहेत, ती पात्र मी वेबसिरीज मध्ये आणली .
पेड फिल्म्स ची लिंक :
अतिशय सुंदर लेख