मुलाखतीची मुलाखत ( राजश्री मराठीचा लोकप्रिय चेहरा दर्शना तांबोळी)

आपण सगळेच युट्युब खूप वेळ वापरत असतो , मनोरंजन विश्वात ल्या बातम्या शोधल्या तर दर्शना ने घेतलेल्या मुलाखती हमखास नजरेत पडतात, तिच्या वेगळ्या शैली मुळे तिने स्वताची ओळख निर्माण केली आहे ,तिच्याशी साधलेला खास संवाद

“माझ्या करियरची सुरुवात पाच वर्षांपूर्वी झाली .त्या आधी मी अकरावी, बारावी वाणिज्य शाखेतून केलं, पण वाणिज्य किंवा गणित हे सगळं म्हणजे कधीच शक्य नव्हतं मला. मग मला प्रश्न पडला ह्या क्षेत्रात तर आपली आवडच नाहीय मग आपण हे का करतोय?
नंतर मी ‘बी एम.एम’ ला प्रवेश घेतला, ‘सोमया’ कॉलेज मधून मी बी एम.एम पुर्ण केलं, आणि बी एम.एम च्या तिसऱ्या वर्षांत मी पत्रकारिता निवडलं.
पत्रकारिता करण्याचा उद्देश हाच होता की, जे सगळे करतात ते मला करायचं नव्हतं.
मला बडबड करायची खुप सवय आहे, तर माझी सवय मला माझा व्यवसाय म्हणुन करायचा होता. म्हणजे कसं तर, मला खुप बोलायला आवडतं, आत्ता मी काय करते तर मी लोकांशी सवांद साधते, फक्त तो वेगळ्या प्रकारे साधते. म्हणुन मी बी एम.एम ला प्रवेश घेतला, ग्रॅज्युएशन पूर्ण केल. आणि बी एम.एम सुरू असताना फर्स्ट इअर नंतर ‘ए.बी.पी माझा ‘ मध्ये इंटर्नशिप केली,
दुसऱ्या वर्षा नंतर मी ‘ झी चोवीस तास ‘ मध्ये इंटर्नशिप केली.
माझं शिक्षण आणि इंटर्नशिप ह्या दोन्ही गोष्टी जेंव्हा मी एकत्र करत होते तेंव्हा मी खुप गोष्टी शिकत गेले. अनेक अनुभव आले, मीडिया कशी आहे हे हळु हळु समजत गेलं.
वर्गामध्ये तुम्ही जे काही शिकता, त्याचा तुमच्या कार्यक्षेत्रात किती उपयोग होतो हे सुद्धा हळु हळु कळत गेलं.
आणि जेंव्हा मी तिसऱ्या वर्षांत आले तेंव्हा बऱ्यापैकी एक अंदाज होता, की आपण चॅनल मध्ये जातो आहे, जर आपण जर्नालिझम क्षेत्रात जातो आहोत तर आपल्या वाट्याला काय येणार? आणि ते आवडत होतं म्हणूनच विचार केला की आपण ह्याच क्षेत्रामध्ये काम करायचं.ग्रॅज्युएशन नंतर मला पुढे शिकायचं की नाही , ह्या वर मी ठाम नव्हते म्हणुन मी औदुंबर एंटरटेनमेंट मध्ये तीन महिने पब्लिक रिलेशन मध्ये काम केलं आणि काम करता करता मग संधी मिळत गेल्या त्यानंतर मी मेन फ्लो मीडिया मध्ये आले, तेंव्हा मी सकाळ मध्ये मी एंटरटेनमेंट रिपोर्टर म्हणुन काम केलं. सकाळची नोकरी करत असताना निखिल वागळे ‘ ह्यांच न्युज चॅनल सुरू होत होतं ‘महाराष्ट्र वन’ नावाचं , तिथे मला संधी मिळाली आणि तिकडे मी दोन वर्ष जनरल अँकर म्हणुन काम केलं .तिथे मी एंटरटेनमेंट शोज सुद्धा करत होते.
कारणास्तव ते चॅनल मला सोडावं लागलं आणि त्या नंतर मी लोकमतला जॉईन झाले. लोकमत डिजिटल मध्ये मी एक वर्ष जनरल रिपोर्टिंग केलं आणि त्यानंतर आत्ता मी राजश्री मराठी मध्ये आहे, इकडे मी फुलं फ्लेज एंटरटेनमेंट कव्हर करते.

तर अशी माझी सुरुवात झाली आहे, आणि आत्ता दीड वर्ष झाली राजश्री मराठी मध्ये, राजश्री मराठीचा मी चेहरा आहे, त्यांची एंटरटेनमेंट अँकर म्हणुन काम करते.
तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करता ना, तेंव्हा आव्हानं ही ठरलेलीच असतात. कुठलाही काम सोपं नसतं म्हणजे अगदी साधं एखादा हमाल जेंव्हा काम करतो तेंव्हा त्यालाही अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, मग ती नॅचरल असतील किंवा इतर असतील तसंच आहे ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा आव्हानं तुमच्या समोर रोज उभी असतात आणि सगळ्यात महत्वाचं आव्हानं असतं , ते म्हणजे आपण काय वेगळं करणार ? कारण जेव्हापासून मी युट्यूब चॅनल मध्ये काम करते, आणि युट्यूब चा क्राऊड हा नॉर्मल क्राऊड पेक्षा वेगळा आहे, म्हणजे सहजच एखादी मुलाखत त्यांना कधीतरी भावतो. पण युट्यूब वर नेहमी वेगळं काहीतरी बघायला प्रेक्षकांना आवडत असतं. त्यामुळे तुमचा कन्टेन्ट, तुमचा आर्टिस्ट वेगळ्या प्रकारे लोकांपुढे प्रेझेंट कराल की लोक तुमचा व्हिडिओ बघतील हे माझ्या समोर रोजच आव्हानं असतं. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या सेलिब्रिटीचा  इंटरव्ह्यू सगळेच करतात आणि तो सगळ्यांनी बघितला आहे. चॅनल वर बघितलाय, प्रिंट वर बघितलाय, पण जेंव्हा तो सेलिब्रिटी माझ्याकडे येतो  तेंव्हा मी एक युट्यूब व्हिडिओ क्रियेटर म्हणुन काय वेगळं करू शकते ह्याच आव्हानं रोज माझ्या समोर असतं.आपण इतरांपेक्षा कसं वेगळं ठरू हे दाखवण्याचं आव्हानं असतं. बाकी इतर सगळी आव्हानं तर येतच असतात तुमच्या वाट्याला मग ते उशिरा जायचं असेल घरी किंवा सणासुदीला सुट्टी नसते, किंवा तुमच्या घरच्या कार्यक्रमाला तुम्ही अनुपस्थित असता. अशी अनेक आव्हानं असतात, घरच्यांना सामोरं जायचं असतं. पण ती सगळी आव्हानं झेलत जेव्हा तुम्ही काम करता तेंव्हाच तुम्ही खरं माणूस म्हणुन तुम्ही उतरता अस मला वाटतं.
पण जर कामाच्या बाबतीत तु विचारत असशील की काय आव्हानं आहेत ? तर तुमचा कन्टेन्ट छान पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर कसा मांडता येईल हेच खरं मोठं आव्हानं असतं.
पॉझिटिव्ह राहण्यासाठी मी निगेटिव्ह गोष्टीकडे दुर्लक्ष करते. म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये म्हणा, किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणा पाय खेचण्याची पद्धत आहेच. आणि हे जगजाहीर आहे.
पण मग अशा वेळी मी काय करते? तर अश्या वेळी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते.
जेंव्हा तुम्ही निगेटिव्ह गोष्टींना दुर्लक्ष कराल ना तेंव्हा तुम्हाला ताकद आपोआपच मिळत जाते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर एक छान स्माईल हवी मग तर तुम्ही कुठल्याही परिस्थितचा सामना करू शकता.

इंटरव्ह्यू घेतल्या मुळे बदल जाणवतात म्हणजे असं होत की प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्ती पेक्षा वेगळी असते. एकदा सेलिब्रिटी दुसऱ्या सेलिब्रिटी पेक्षा वेगळा असतो, एखाद्याला तुम्ही पटकन मोल्ड करू शकता पण एखाद्याला मोल्ड करन थोडंसं कठीण जातं. अशा वेळी ते तुमचं टॅलेंट असतं किंवा तुमचं चॅलेंज असतं की तुम्ही त्या व्यक्तीला कसं तुमच्या मध्ये रुजवाल
माझ्या व्यक्तिमत्वा मध्ये काय बदल झाले तर म्हणता येईल की ,माझ्यातला  खुप आत्मविश्वास वाढला, तेंव्हा तो जो काही पहिला इंटरव्ह्यू मी घेतला होता, तेंव्हा जी काही मी अवघडलेली होते, तसं आता वाटत नाही. तुम्ही खुप लोकांसोबत बोलता त्यामुळे तुम्हाला ती एक सवय लागते बोलायची, ऐकुन घेण्याची, त्यांना आपलंसं करून घ्यायची. पर्सनली बदल म्हणायचे झाले तर आपण खुप छान आणि शिस्तीत बोलायला लागतो लोकांशी , तुम्हाला लोकांना मान देता येतो किंवा आपल्या पेक्षा मोठ्या व्यक्तींशी कसं बोलायचं , आपल्या पेक्षा लहान माणसांना कसं कंफर्टेबल करून घ्यायचं ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. तर यांना बदल म्हणायचे झाले तर ते झाले. आणि जेंव्हा मी माझ्या घरी किंवा मी ट्रेन मध्ये असते किंवा मी प्रवास करत असते तेंव्हा लोक मला भेटतात जे माझा चॅनल फॉलो करतात तर ते मला आवडीने म्हणतात की मॅडम तुम्ही खुप छान बोलता किंवा तुम्ही जेंव्हा बोलत तेंव्हा ते ऐकायला खुप आवडतं , आम्हाला आवडतं तुमचे व्हिडियोज बघायला किंवा खुपदा मला फेसबुक वर इंस्टाग्राम वर लोक मेसेज करतात की प्लीज त्या सेलिब्रिटी चा इंटरव्ह्यू घ्या ना, आम्हाला बघायचं आहे तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेताना. हेच सगळे बदल आयुष्या मध्ये जाणवतात. आणि काही काही आपल्या इंडस्ट्री चे सेलिब्रिटी आहेत जे म्हणतात , “अच्छा दर्शना इंटरव्ह्यू घेणार आहे का?” जे खुप आवडीने येतात. ” अच्छा राजश्री मराठी वर इंटरव्ह्यू येणारय का?” सो हेच बदल आहेत की तुम्ही जेंव्हा लोकांना आपलंसं करता , तेंव्हा त्यांनाही वाटत की ह्या व्यक्तीने आपला इंटरव्ह्यू घ्यावा, मग ती एक खूप मोठी पोचपावती आहे .
मिडिया क्षेत्र म्हणण्या पेक्षा डिजिटल क्षेत्र खूप विस्तारलेलं आहे रोज एक नवीन युट्यूब चॅनेल बघायला मिळतो असं म्हणायला हरकत नाही ,सगळ्यांचाच व्याप आता वाढतो आहे तर मी काय करत आहे राजश्री मराठी चॅनेल वर त्याच्यातच मला आणखी चांगल्या चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, त्या त्यातच मी खुश आहे आपल्याला.
भविष्याचा मी फार काही विचार केला नाहीये पण आता जे करत आहे ते खूप छान आहे,
स्वतःला कुठे बघायचं आहे ह्याचं मी टिपिकल मुली सारखं उत्तर देईल ,मी खूप शॉपिंग करत आहे पण शॉपिंग करताना मी प्रिस टॅग कडे बघत नाहीये, एवढं यशस्वी मला व्ह्यायचं आहे,
एंटरटेनमेंट माझं पॅशन आहे.
आणि ते पॅशन जगायचं आहे, जसं लोकं म्हणतात खूप मज्जा येते तुझ्याशी बोलून तसंच मला ऐकत राहायचं आहे, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने होईलच ते शक्य.”
-श्रद्धा जगदाळे.

Related Posts