अपना तो फिर भी कम है . हा दृष्टीकोन ठेवणारी संगीता अगदी पहिल्या भेटीत आपलीशी वाटते.
संगीता राजस्थान मधल्या मंदोर तालुक्यातली. लहापणा पासून खूप गोंधळ घालणारी आणि धडपडी वृत्तीची आहे.

संगीताची प्रवेश प्रक्रिया चालू झाली ,आपल्याला आता घरच्यां पासून लांब राहावे लागणार हे समजल्यावर संगीताने तिथून पळ काढला .पण तिला पकडून आणले गेले,आपल्याला घरच्यां पासून लांब राहावे लागणार ह्या जाणीवेने संगीता आत रडत होती आणि आपली मुलगी आपल्या पासून दुरावत आहे ह्या जाणीवेने बाबा बाहेर .
वेळेसोबत संगीता तिथे रुळू लागली .
तिच्या शाळेत एक पि.टी शिकवणारे त्रिपाठी सर होते ते विद्यार्थ्यांना खूप पळायला लावायचे तेव्हा संगीता पोटात दुखतंय हे कारण देऊन व्यायाम चुकवायची .
ती १० वर्षांची असताना २००३ साली शाळेने पहिल्यांदा मुलींना सुद्धा लंडनमध्ये होणाऱ्या मिनी पॅरालिंपिक पाठवण्याचा निर्णय घेतला .त्यात संगीताच सिलेक्शन झालं. लंडन वरून जिंकून आल्यावर त्रिपाठी सर मज्जे ने म्हटले काय संगीता ,अजून दुखतंय का तुझ पोट ? त्या वेळेस संगीताला हसू आले होते. आठवणीतला तो एक अविस्मरणीय क्षण होता.
ह्या निमित्त तिला डॉ ए .पी .जे अब्दुल कलाम , अजय देवगण ह्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.
२०१२ साली तिने सामान्य मुलींसोबत क्रिकेटच्या स्पर्धेत भाग घेतला होता .
मधल्या काळात कॉलेज संपल्यावर आणि स्पोर्ट्स साठी कोणी मार्गदर्शक न मिळाल्या मुळे संगीता खेळा पासून लांब गेली होती .
२०१६ साली जोधपूरला पोहण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तिथे तिने सहभाग घेतला, इथे तिला दिनेश उपाध्याय सरांच्या रूपाने पुन्हा एक आशेचा किरण मिळाला ,सरांनी तिला पुन्हा नव्याने सुरवात करण्यासाठी प्रोत्सान दिले .त्यादिवसापासून पुन्हा संगीता खेळू लागली . पॅरालिंपिक स्पर्धे मध्ये आरोग्यासोबत चांगल्या खेळासाठी पायाचे चांगले ब्लेड आवश्यक असते.
२०१८ मध्ये लोक निधीच्या सहाय्याने तिला साढेचार लाखांचे नवीन ब्लेड मिळाले .तेव्हा पासून सांगिताच्या खेळात प्रगती झाली .२०१६ पासून ४ राज्य पातळीच्या स्पर्धा आणी ३ राष्ट्रीय पातळीच्या स्पर्धांमध्ये ती सहभागी झाली आहे आणी प्रत्येकवेळी सुवर्णपदक प्राप्त केले .२०१८ साली तिने २ चांदीचे पदक प्राप्त केले,आगामी काळात होणाऱ्या स्पर्धेत उतरण्यासाठी तिचे प्रयत्न चालू आहेत.
ह्या व्यतिरिक्त सायकल,स्कूटर अशा विविध स्पर्धेत ती भाग घेत असते.सामाजिक कार्यांना ही तिचा हातभार लावते
तसेच अनेक शाळांना मध्ये जाऊन मुलींना मार्गदर्शन ही करते .
अशी ही जगण्याचा सूर गवसलेली संगिता विश्नोई
-श्रद्धा जगदाळे