
शांततेच्या पोकळीत असो वा गर्दीतल्या कोलाहलात एक संगीत दडलेलं असतं शब्दांनी त्याला परिपूर्णता मिळत जाते आणि जर शब्द आणि संगीत उत्कट असेल तर मनाच्या लहरींना वेगळ्याच पातळीवर एखादी गझल घेऊन जाते .अशाच उत्कट गझल लिहिणाऱ्या ,त्याच बरोबर गोड आवाज असलेल्या आणि खानदेशी संगीतात Ph.d असलेल्या डॉ संगीता म्हसकर ह्यांच्या रचना भान हरपून टाकतातच पण काळजाला ही टोचतात आणि भिडतात सुद्धा !
डॉ.संगीता म्हसकर तशा मूळ जळगावच्या वडील प्रा .एन .व्ही पटवारी हे तत्वज्ञान आणि मानाशास्त्राचे प्राध्यापक होते तसेच शास्त्रीय संगीताचे तज्ज्ञही होते .साहजिकच डॉक्टर संगीता ह्यांची जडणघडण ही सांगीतिक वातावरणात झाली .लहानपणी अनेक गाण्यासाठी बक्षिसं ही मिळाली .राज्यशास्त्र आणि संगीत ह्या विषयात त्यांनी पदवी प्राप्त केली .त्याच काळात त्या लेखनाकडे वळल्या मा.अशोक पत्की ह्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांच्या गाण गाण्याची संधी मिळाली पण ग्रामीण भागात राहत असल्या मुळे त्यांना ह्या क्षेत्रात करियर फार करता आले नाही .

पुढे प्रत्येकाच्या आयुष्यात येतो तो टप्पा त्यांच्या ही आयुष्यात आला .डॉ श्रीकांत म्हसकर ह्यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या .बाई म्हटलं की नवीन गोष्टींची जुळवाजुळव आणि नव्या ठिकाणी रुळत जाणं आणि अगदी साखरे सारखं मिसळण हे आलंच,ह्या सगळ्यात डॉ संगीता ह्यांना आपली आवड जोपासायला वेळ मिळाला नाही .घरा बाहेर पडण तसं अवघड असल्यामुळे त्यांनी लेखन चालू ठेवले पुढे जाऊन खानदेशाची सांगितीक वाटचाल ह्या मध्ये त्यांनी एस .एन .डी .टी विद्यापीठातून पीएच .डी प्राप्त केली .त्यांच्या ह्या प्रबंधाला जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ अहमदनगर या संस्थेचा राज्य स्थरीय पुरस्कार प्राप्त आहे .ह्याच काळात जळगावातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पदव्युतर संगीत विभागाची उभारणी केली . त्यांच्या करियरच्या वाटेत पुरुषी वर्चस्ववाद हा आलाच पण म्हणून त्या डगमगल्या नाहीत त्यांनी त्यांचे कार्य चालू ठेवले .श्वासातले तराणे हा त्यांचा गझल संग्रह प्रकाशित आहे त्याच बरोबर राजूचा रोबो हे बालनाट्य.
कधी फुलात रंगले हा त्यांचा म्युझिक अल्बम आपल्यला saavn app वर उपलब्ध आहे .
आपली वाट आपणच चालायची असते हे तत्व .अशा ह्या डॉ .संगीता म्हसकर आयुष्याच्या चढत्या उतरत्या लयींच्या ठेक्याला पकडत आपलं जगणं आहे त्यात सुरेल केलं ..तुम्ही सुद्धा करताय ना !