अमेरिकेत वेदिक डेंटिस्टट्री सुरू करणारी पहिली भारतीय डॉ कल्पना रणदिवे

तुला डॉक्टर का व्हावंसं वाटलं?
कल्पना: माझी आई सरकारी दवाखान्यात नर्स होती, आणि बाबा दवाखान्यात रेकॉर्ड ऑफिसर होते, लहानपणी मी आई सोबत हॉस्पिटलमध्ये मध्ये जायचे मला गोष्टी जाणून घेयचे कुतूहल असायचे माझे आजोबांकडे म्हणजे आईच्या वडिलांकडे पूर्वीच्या काळी गावात कोणी आजारी पडले तर उपचारासाठी येयचे ,त्यांना आयुर्वेदिक औषधांचे ज्ञान होते. कदाचित ह्यांचा प्रभाव माझ्यावर असल्यामुळे मला डॉक्टर आणि माझ्या आई वडिलांना मी डॉक्टर व्हावं असे वाटलं असेल.

पण मग डेंटिस्टच का ?
कल्पना : मला खरं तर आयुर्वेदा बद्दल आकर्षण होतं , पण त्या वेळेस आयुर्वेदिक ट्रीटमेंट फार प्रमाणात केली जात नव्हती, ह्या वास्तवाची जाणीव आईने करून दिली होती, बाबांची अशी इच्छा होती की मी कार्डिलॉजिस्ट बनवावं, डॉक्टर तर बनायचं होतं पण स्ट्रेस नको होता म्हणून मी डेंटिस्ट बनायचं ठरवलं.

भारत ते अमेरिका तुझ्या प्रवासा बद्दल सांग ?
कल्पना: भरतीविद्यापीठा मधून बी. डी. एस पूर्ण केल्यानंतर मी मणिपालच्या एंटरन्सची तयारी सुरू केली ,त्यावेळेस महाराष्ट्रा मधून सिलेक्ट झालेली मी पहिली मुलगी आणि व्यक्ती होते .मणिपालला मी पेरिडॉन्टिक्स
मध्ये मी स्पेशलायझेशन केलं.शिकत असताना आयुर्वेदा आणि डेंटिस्ट्रीचा मनातल्या मनात संबंध जोडायचे, it was like connecting the dots.
माझी धाकटी बहीण अमेरिकेला गेली होती ,एकदा मस्करीत ती मला म्हणाली बघ तुला इथे शिकायला येता आलं तर, म्हणून मस्ती मध्ये मी बोस्टन युनिव्हर्सिटीच्या रेसिडेंशियल प्रोग्रामसाठी अर्ज केला आणि मी सिलेक्ट झाले , मला खरं भारतात राहून काही करायचं होतं आणि मी एक महिन्यात यु. एस ला होते तिथे मी इंप्लांटोलॉजी मध्ये स्पेशलायझेशन करणारी पहिली भारतीय मुलगी ठरले. मला भारतात एक जॉब ऑफर आल्यामुळे मी भारतात येणार होते,मला भारतात राहायचं होतं पण माझ्या नवऱ्याने मला लग्नासाठी कनव्हीन्स केले आणि मी पुन्हा यु. एस मध्येच स्थिरावले.
गरोदर असल्यामुळे माझी डेंटिस्टट्रीची प्रॅक्टिस बंद होती पण पुन्हा मी शून्यातून पुन्हा सुरवात केली. 4 डेंटिस्टट्री मध्ये डिग्री असून मी युपेंन युनिव्हर्सिटी मध्ये पुन्हा यु.जी चा कोर्स केला. तिथे मला अनेक बक्षिसं मिळाली.

यु. एस मध्ये तुला आलेली आव्हानं कोणती ?
कल्पना :घरात व्यासायिक पार्श्वभूमी नसल्यामुळे इथले कायदे समजून घेणं, व्यवसाय कसा करायचा हे शिकणं हे खूप मोठे आव्हान होते.
मेडिकलचे शिक्षण घेत असताना फक्त मेडिकलचे ज्ञान दिले जाते पण पुढे जाऊन तेच डॉक्टर आपलं हॉस्पिटल उभारणारे असतात ,ते चालवायचं कसं ह्याचं ज्ञान दिलं जात नाही. मी येता जाता कार मध्ये व्यवसाय कसा करावा ह्याचे ऑडिओ बुक्स ऐकत असे, वर्षभरात मी 1000 च्या आसपास ऑडिओ बुक्स ऐकल्या असतील, ह्याचा फायदा मला हॉस्पिटलच्या उभारणीसाठी झाला.
अनेक अनुभव आले जे मला शिकवत गेले वाईट डेंटिस्ट्री काय असते, काय नाही केलं पाहिजे ,त्याच बरोबर आपण आपली जगण्याची मूल्य कशी जपली पाहिजेत हे शिकले.
अखेर मी 2007 झाली 3D टेक्नोलॉजी असलेलं पूर्ण डिजिटलाइझ्ड हॉस्पिटल मेरिलँड, MD,USA इथे उभारलं ,पूर्ण डिजिटलाइझ्ड असलेलं तिथे ते पहिलच हॉस्पिटल होतं.
मग मी विचार करू लागले आयुर्वेदा डेंटिस्ट्री मध्ये लिगली कसं आणता येईल? मग आयुर्वेदाचा अभ्यास सुरू केला ,त्याचे सर्टिफिकेशन्स ही केले.
2016 ला ऑर्लॅंडो इथे एका इंटरनॅशनल काँफेरन्स मध्ये मी पहिल्यांदा आयुर्वेदा इन डेंटिस्टट्री ह्याचा परिचय करून देणारी पहिली भारतीय ठरले.

तुझ्या कंपनीची नावं कोणती?
कल्पना : वेदिक हेल्थ आणि वैदिक डेंटल .

तुला भारतात येयला आवडेल का?
कल्पना :हो, नक्कीच माझं स्वप्न भारतात राहून काम करायचं होतं पण कदाचित नियती ने माझी निवड इतर कोणत्या कामासाठी केली असेल असं मला वाटतं .आता मी इस्ट आणि वेस्ट मध्ये मिळालेलं ज्ञान एकत्र माझ्या रुग्णांना बरं करण्यासाठी वापरू शकते आणि त्यांना पटवून ही देऊ शकते.लवकरच माझा भारतात पुन्हा येण्याचा विचार आहे

अधिक माहिती साठी ह्या संकेतस्थळावर भेट द्या

Related Posts