गोष्ट कल्लाकार ते कलाकारांना सामावून घेणाऱ्या क्लबचरची .

गोष्ट कल्लाकार ते कलाकारांना सामावून घेणाऱ्या क्लबचरची .

व्यक्त होणे ही माणसाची गरज आहे आणि त्यातूनच विविध कला आविष्कारांची निर्मिती होते.काहींची कला ही स्वांत सुखाय असते तर काहींना आपली कलाकृती इतरांपर्यंत पोहोचवायची असते पण प्रत्येकाच्या मनात समविचारी कलकारांशी जोडले जाण्याची , ज्ञान वाढवण्याची ,कले विषयी आपलं प्रेम समजून घेण्याची आणि त्या कलेवर प्रेम करण्याची भूक असते . मग त्या भुकेपोटी अनेक कलाकार एकत्र येतात विविध विविध व्यासपीठांवर आपली कला सादर करतात . दशकानुदशके , पिढ्यांपिढ्या हा अनेक व्यासपीठांची निर्मिती होते हा प्रवास अखंड चालू राहतो. असंच सर्व कलाकारांना एकत्र करण्याचे स्वप्न ‘संकेत अनगरकर’ ह्या गरवारे महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलाला पडलं आणि आणि ‘क्लबचर’ ची स्थापना झाली. गरवारे मध्ये मास कम्युनिकेशन शिकत असताना नाटक , लेखन , लघुपट निर्मिती अशा विविध कलाकृतींच्या निर्मिती मध्ये संकेत सक्रिय होता. ‘फर्स्ट टाईम फ्लिम मेकर लॉस एंलिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये’ निवड झालेल्या ‘बाप्पा मोरया ‘लघुपटाचे लेखन , दिग्दर्शन करताना क्लबचर ची संकल्पना संकेतच्या मनात आली आणि कोणत्या एकाच प्रकारची कला सादर करणाऱ्या कलाकारांचा काबिला न जमवता सर्वच प्रकारच्या आणि सर्वच वयोगटातील कलाकारांना एकत्र जमवण्याचे क्लबचरचे ध्येय आहे. ह्या प्रवासात मित्रमंडळींची संकेतला मोलाची साथ लाभली. सप्टेंबर २०१९ पासून वाचनोत्सव कार्यक्रम घेण्यात आले , तसेच कलासांज नंतर ओंकार चॅरीटेबल ट्रस्ट आणि ट्री हाऊस सोबत संयुक्त विद्यमानाने शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . ज्यात सुमारे 1700 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. 26 जानेवारी 2020 रोजी क्लबचर तर्फे ‘कॅप्पेला’ हा गाण्यांच्या खेळांच्या कार्यक्रमाचे आयोजन म्युझिक कॅफे, लॉ कॉलज रोड इथे करण्यात आले आहे. संकेत अनगरकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लावलेल्या रोपट्याचे निश्चित सर्वां कलाकारांच्या सोबतीने वृक्षात रूपांतर होईल अशी तो अपेक्षा ठेवतो आणि सर्वांनी क्लबचर चा भाग होण्याची इच्छा व्यक्त करतो.

– श्रध्दा जगदाळे

Related Posts