संघर्षाची वाट चालून झाल्यावर त्याचे गोडवे तर सगळेच गातात पण ती वाट चालत असताना आपल्याच अवती-भवतीच्या व्यक्तीला टिपणं हा आनंद काही वेगळाच .
माझ्या लेखणीच्या मध्यमातून मला एका व्यक्तीला टिपावंसं वाटलं तिचं नाव म्हणजे अपूर्वा लेले.. वय वर्ष फक्त 25.. एक उदयोन्मुख छायाचित्रकार .आज तिचा पुण्यात स्वत:चा स्टुडिओ आहे नुकतेच तिने
MA Commercial Photography at NTU (Nottingham Trent University, Nottingham, United Kingdom) मधून फोटोग्राफीची पदवी पूर्ण केली. अपूर्वा म्हणजे मला आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा अखंड वाहणारा झराच वाटते..
तिच्या शेवटच्या वर्षातला प्रोजेक्ट हा बॉडी पॉझिटीव्हीटी वर होता.. आपण जसे आहोत अगदी तसेच आपण स्वत:चा स्वीकार केला पाहिजे हेच सांगणारा.अपूर्वाशी साधलेला खास संवाद:
1) तुला फोटोग्राफीची आवड कशी निर्माण झाली?
अपुर्वा : मी 11वी मध्ये असताना एक छोटा पॉकेट कॅमेरा घेऊन एक फुलांचं प्रदर्शन पहायला गेले होते, तिकडे खुप सारे फुलांचे फोटो काढले, नंतर घरातल्या लोकांना आणि मित्र-मैत्रिणींना दाखवले.. सर्वांना ते फोटो खूप आवडले… मग पुढे 12 वी ची परीक्षा झाल्यावर माझ्या काकांनी “तुला काय गिफ्ट हवंय ?” विचारलं, मी थोडा विचार करून ‘कॅमेरा घे’ असं म्हणाले. त्या कॅमेऱ्यातूनही मी खूप फोटो काढले , कॉलेज मधल्या स्पर्धांना ते पाठवले ,
त्या फोटोंचंही खूप कौतुक झालं. मग मी विचार केला आपण फोटोग्राफी करायला काय हरकत आहे? आई कमर्शियल आर्टिस्ट आणि बाबा पूर्वी फोटोग्राफी करत असल्या मुळे माझ्यात ते गुण उतरले आहेत असं मला वाटतं.
17 व्या वाढदिवशी बाबांनी मला कॅमेरा घेतला आणि आज मी इथे आहे.
कोणत्या प्रकारची फोटोग्राफी तुला आवडते ?
अपूर्वा :मला मुख्य म्हणजे पोर्ट्रेट, फॅशन आणि प्रॉडक्ट फोटोग्राफी आवडते.. ( पण त्याही पलीकडे मी टिपलेले लोक जेव्हा स्वत: चे फोटो बघून हरकून जातात, फक्त सेलिब्रिटीच नाही तर आपण सुद्धा तितकेच छान दिसू शकतो हा आत्मविश्वास जेव्हा मी लोकांच्या डोळ्यांत बघते तेव्हा मला एक समाधान मिळतं..)
सकारात्मक रहाण्या साठी काय करतेस?*अपुर्वा : मी स्वत:शी खूप बोलते आणि जमेल तेवढ्या सकारात्मक लोकांमध्ये रहाण्याचा प्रयत्न करते. सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करते आणि मूड छान होईल अशी गाणीही ऐकते, पण त्याच बरोबर मला माझ्या माऊ सोबत खेळायला खूप आवडतं..
ह्या क्षेत्रात तुला आव्हानात्मक काय वाटतं ?
अपुर्वा : खुप लोक एक मुलगी लीड करत आहे हे पाहिल्यावर चकीत होतात आणि बऱ्याच वेळा माझ्या ज्युनियर असिस्टंट सोबत बोलतात , मी सलग फिल्ड वर काम करू शकते ह्याचं लोकांना आश्चर्य वाटतं
तुझी एक चांगली आणि वाईट आठवण सांग ?
एकदा मी मोठया डान्स शो च्या शूट चं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं ,50% पेमेंट त्यांनी आधी मला दिलं होतं, पण अचानक काही तांत्रिक अडचणी मुळे मला क्लायंटला त्या शो ची तारीख पुढे ढकलावी लागली ,बदलेलल्या तारखेला मी लंडनला माझ्या कुटुंबियांसोबत असणार होते,
म्हणून मी ते काम माझ्या दोन आसिस्टंटना हाताळायला दिले, दुर्दैवाने फोटो चांगले आले नाहीत, पण मी परत आले तेव्हा त्या क्लायंटला पुढचे सगळे फोटो नीट काढेन हे पटवून ते कॉन्ट्रॅक्ट रिजाईन केलं.
ही सगळयात चांगली आणि वाईट आठवण आहे.
तुझे ध्येय काय?
मला पुढे एक सेलेब्रिटी फोटोग्राफर बनायचे आहे आणि काही सेवाभावी कामां मध्ये माझी कमाई सत्कारणी लावायची आहे.