आभाळाला भिडून ही जमिनीवर असणारी व्यक्ती म्हणजे छाया कदम, आयुष्य म्हटलं की काटे-कुटे आलेच पण त्यांना न जुमानता पुढे जाता आलं पाहिजे ,ही शिकवण छाया ताई कडे बघून मिळते. ऑनस्क्रिन असो वा ऑफस्क्रीन  छाया ताई प्रत्येकाला आपल्या जवळच्या व्यक्ती पैकी एक वाटते.
छाया ताईची प्रत्येक भूमिका ही मनावर छाप पाडते ,सैराट,फँड्री,न्यूड, रेडू, वाघेऱ्या, हंपी ह्या सारख्या असंख्य चित्रपटांच्या द्वारे साकारलेल्या भूमिका लोकांच्या  मनावर छाप पाडतात , आपल्या आजूबाजूचंच एखादं जिवंत पात्रं आपण बघत आहोत असा भास होतो,अभिनयासाठी म.टा, झी गौरव, राज्य चित्रपट पुरस्कार ,दादा साहेब फाळके पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.छाया ताईची अभिनेत्री म्हणून जडणघडण कशी झाली हे जाणून घेण्यासाठी तिच्याशी साधलेला संवाद.

 अभिनेत्री म्हणून तुझ्यावर कशाचा प्रभाव जास्त राहिला आहे? त्याची पाळंमुळं कुठे आहेत?

छाया ताई : शाळेत प्रत्येक महिना अखेरीस  एक स्पर्धा असायची , एकपात्री, डान्स असो नाटक ,शाळेतल्या बाई मला स्पर्धांण मध्ये सहभागी करून घ्यायच्या प्रत्येक स्पर्धेत मी पहिली यावे असं मला वाटायचं पण अभिनेत्री म्हणून मी करियर करावं असं कधी वाटलं नाही,
चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी  वेगळ्या घराण्यात जन्माला यावं लागतं असं मला वाटायचं .
माझ्या वडिलांचं अचानक निधन झालं आणि भावाचा निधन त्याच वर्षी झालं ,मी घराततून बाहेर पडणं बंद केलं , घराबाहेर कुठेच जावसं वाटायचं नाही ,ह्यातून मला बाहेर पडायचं होतं त्यावेळेस वामन केंद्रेंच्या वर्कशॉपची  जहिरात पेपर मध्ये मी वाचली,त्यावेळेस वाटलं चला,ह्या वोर्कशॉपच्या निमित्ताने घराच्या बाहेर पडू या, आणि मी वामन केंद्रेंच वर्कशॉप अटेंड केलं ,तिथे मला कलाटणी मिळाली.
तिथे मला कळलं अभिनय म्हणजे खायची गोष्ट नाही, खूप वाचावं लागतं, भाषेवर काम करावं लागतं, निरीक्षण जास्त असावं लागतं , सर ज्यावेळेस सांगायचे तू अमुक पात्रं कर , तेव्हा दोन तासात ते पात्रं कसं बोलेलं,त्याची देहबोली कशी असेल ह्याचा अभ्यास व्ह्यायचा दोन तास कसे निघून जायचे हे कळायचंच नाही ,ह्या गोष्टी मला मजेशीर वाटायला लागल्या,ह्यातच आपण बिझी राहिलो तर वेळ छान जाईल असं वाटायला लागलं आणि नशिबाने मला पहिली संधी वामन केंद्रेंच्या झुलवा नाटकात काम करायची संधी मिळाली.
  • कुठल्या शैलीतच्या दिग्दर्शकां सोबत तुला काम करायला आवडतं?

छाया ताई : मला कथे मध्ये काही वेगळं असेल तर काम  करायला आवडतं,नशिबाने मला तशी कामं मिळतं गेली.मला विनोदी काम करायला आवडेल,पण रियलीस्टिक. त्यासाठी मी खऱ्या विनोदी माणसांचं निरीक्षण करत असते.
  • तू आता पर्यंत तुझ्या वयापेक्षा जास्त वयाचे  रोल  करतेस ह्याचा कधी त्रास होतो का?

छाया ताई :अजिबात नाही ,मला ह्या पात्रांमुळे मला ओळख मिळाली आहे ,कुठे गेले ही लोकं मला पटकन ओळखत नाहीत , लोकं अचंबित होतात ते पात्र साकारणारी मी आहे आहे .मला मज्जा येते.

  • टाईपकास्ट होण्याची भीती वाटते का?

छाया ताई :अजिबात नाही ,मी नेहमी वेगळ्याच्या शोधात असते, माझं काम बघून माझा चेहरा अमुक भूमिकेसाठी छान जाऊ शकतो किंवा मी अमुक प्रकारचा रोल छान करू शकते हे लोकांना वाटणं आणि त्यांनी माझा त्या भूमिकेसाठी विचार करणं साहजिक आहे, कदाचित एखाद्या दिगदर्शकाला मी अजून वेगळ्या भूमिकेत येऊ शकते वाटलं तर आगामी काळात तुम्ही मला वेगळ्या भूमिकां मध्ये पाहू शकाल.

  • तू भूमिकेचा अभ्यास कसा करतेस?

छाया ताई :पुस्तकं जास्त वाचली पाहिजेत, पण मी पुस्तकांपेक्षा माणसांच निरीक्षण जास्त करते हाच माझा अभ्यास असतो.

  • हिजडा शॉर्ट फ्लिम बद्दल सांग?

छाया ताई :संतोष माने ,जे हिजडा शॉर्टफ्लिमचे डायरेक्टर आहेत त्यांनी डोक्यात मला घेऊन ठेवून वेगळ्या कथा ऐकवल्या होत्या, हिजडा शॉर्टफ्लिमची कथा त्याने मला ऐकवली ,मी नेहमी वेगळ्या गोष्टींच्या शोधात असते, मी सहज संतोषला विचारलं मी हे पात्रं साकारू का? तो पर्यंत त्याने ही विचार केला नव्हता कोणती स्त्री ही भूमिका साकारू शकते,
पहिल्या शॉट च्या वेळेस एक गंमत झाली, मला खरंच एका व्यक्तीने पैसे दिले होते मला कळत नव्हतं मी पैसे घेऊ की नको.पण मी ते घेतले.
  • नाटक कि सिनेमा कशात काम करायला जास्त आवडतं?मालिकांमध्ये काम करायला आवडेल का ?

छाया ताई :वेळ आणि आर्थिक गणितं ह्यांची सांगड घालता आली तर मला मालिकां मध्ये काम करायला आवडेल, सिनेमाला मी नेहमी प्राधान्य देईल.

Related Posts