छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असलेल्या विविध भाषा आणि लिपी या विषया वरती आज आपण माहिती घेणार आहोत. हिंदुस्थान हा वेगवेगळ्या राज्यांचा, भाषांचा, रिती रिवाज , परंपरेचे, वेशभूषेचा, अलंकारांचा, विविध लिपींचा बनलेला आणि विविधतेने नटलेला एक मोठा देश आहे.
या हिंदुस्थानात आजपर्यंत अनेक सत्ता येऊन गेल्या आणि प्रत्येक सत्तेचं काहीतरी वैशिष्ट आपल्याला दिसून येतं. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या आधी असलेल्या बहामनी काळात सुद्धा चलनात, व्यवहारात वेगवेगळ्या भाषा आणि लिपींचा वापर केला आढळून येतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी फारसी लेखन करण्यासाठी विशेष व्यक्तींची नेमणूक केली होती. त्याच बरोबर इतर देशांतील पत्रव्यवहार वाचण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या भाषांतर-कारांचा सहभाग आढळतो. शिवाजी महाराजांच्या काळात संस्कृत, फारसी(पर्शियन), मराठी, गुजराती, पोर्तुगीज, डच आणि इंग्रजी इत्यादी भाषांचा वापर केलेला आढळतो. भाषांबरोबरच लिपीला सुद्धा तितकेच महत्व आहे कारण भाषा ही फक्त बोलण्यासाठी वापरली जाते मात्र आपल्याला लेखी पत्रव्यवहार करायचा असेल तर त्यासाठी लिपी हे एकमेव साधन आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फारसी लिपी, देवनागरी लिपी, मोडी लिपी, या तीन लिपी मोठ्या प्रमाणात वापरल्या जात होत्या. आपल्याला आजही मोडी आणि फारसी लिपी मध्ये लिहिलेले फर्मान मोठ्या प्रमाणात मिळतात. त्या वेळी हा विचार केला गेला होता की, जर अखंड हिंदुस्तानात हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे असेल, तर त्यासाठी शत्रूच्या राज्यात किंवा गोटात काय चालू आहे, हे कळण्यासाठी त्यांचा एक प्रमुख गुप्तहेर प्रत्येक राज्यात कार्यरत असावा. जेणेकरुन त्या राज्याची इतंभुत माहिती आपल्याला कळेल. त्या राज्यातून आलेले पत्रव्यवहार वाचण्यासाठी महाराजांच्या दरबारात त्या भाषेत अग्रेसर असलेले जाणकार देखील असत. यामुळेच शत्रूच्या राज्यातील बखरी ( खबरी ) मिळवणे सोपे झाले असे म्हणायला हरकत नाही.
फारशी भाषा
ज्या मराठी भाषेला, महाराष्ट्रीयांना फार अभिमान आहे, त्या भाषेतून हजारो पर्शियन शब्द काढून टाकले गेले तर ते एका भाषेचा विषय बनू शकेल. औरंगजेबाची सैन्य जवळजवळ 40 वर्षे दख्खन मध्ये होती आणि जवळील आदिलशाही, निजामशाही आणि मुघल राजवंशांनी मराठीवर जोरदार प्रभाव पाडला. उदाहरण द्यायचे झाल्यास ‘आजार’ (बाजार = आजार), ‘तंबी’ (चेतावणी), ‘फकत’ (फकत = केवळ, केवळ), ‘फडनीस’ (पर्शियन विकृति ‘फरदनावीस’; ‘फरद’ म्हणजे यादी, ‘फॅरिस्ट,’ मराठी आणि बांगला मध्ये आणि दोन्ही भाषांमध्ये खाती अर्थ सांगण्यासाठी देखील वापरली जाते). पेशवाई काळात लेखाजोखा ठेवणार्या ब्राह्मणांना ‘फडणीस’ म्हटले जात असे; ‘अश्तापाईलू’ (पारशीतील हस्टपाहलू; हॅशट = आठ, पहलू = पैलू म्हणजे अष्टपैलू किंवा बहुमुखी व्यक्ती). महाराष्ट्रातील लोकांनी बसमध्ये ‘निम अरम’ (अर्ध लक्झरी) लिहिलेले पाहिले आहेत. ‘कडुनिंब’ हा एक पर्शियन उपसर्ग आहे जो ‘अर्ध’, ‘अर्ध’ किंवा ‘अर्ध’ (नेम्बाज आंखें = एका मुलीचे अर्धे उघडे डोळे) दर्शवितो.
मोडी लिपीचा इतिहास –
काही इतिहासकारांच्या मते इसवी सनाच्या १२६० या काळात मोडी लिपी ही देवगिरीच्या राज्यात पंतप्रधान म्हणून सेवेत असेलेल्या हेमाद्रीपंडित उर्फ हेमाडपंतांनी ही श्रीलंकेवरून आणली तर काहींच्या मते त्यांनी ती स्वतः तयार केली आहे, तसेच मोडी लिपी आणि ब्राम्ही लिपी ह्यांच्यात भरपूर साम्य आढळते अनेक वेगवेगळी मते आहेत .ज्ञानेश्वरांच्या एका ओवी मध्ये मोडीला ‘वेगवंतु ‘असे संबोधले आहे. भारतभर मोडीचा वापर राज्यकारभारासाठी केला जायच. त्यामध्ये आर्थिक कागदपत्रे, महसुली कागदपत्रे, राजकीय कागदपत्रे, न्यायालयीन कागदपत्रे आढळतात. मोडी लिपीला शीघ्र लिपी म्हणून ओळखली जायची. मोडी लिपीत एका अखंड शिरोरेषेवर अक्षर काढली जाते. शिवकाळात व नंतर पेशवेकाळात या मोडीचा वापर संपूर्ण भारतभर पसरला. त्यात पुणे, मुंबई, धुळे, कोल्हापूर, औरंगाबाद, गोवा, दिल्ली, जबलपूर, नागपूर, बिकानेर, सितामहू, हैद्राबाद, चेन्नइ, बंगलोर, तंजावूर ओरिसा, आसाम, बडोदा, काश्मीर या मूळ पुराभिलेखगरांमध्ये सापडतात. काळाप्रमाणे मोडी लिपीच्या अक्षरांमध्ये बदल होत गेले बहामनीकाळ, शिवकाळ, पेशवेकाळ व आंग्लकाळ हे प्रमुख ४ प्रकारे मोडी ची वळणे बदलली. राज्याप्रमाणे मोडी लिहिण्याची पद्धत ही बदलत गेली. वाराणसी मध्ये जी मोडी लिपी वापरली जायची त्यावर फुलांचे शिक्के आढळतात, तसेच ब्राम्हणवर्गाला शिक्षणाचा हक्क होता, त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याला त्याची सही करताना नांगर, न्हावी वस्ताऱ्याचे, माळी फुलांचे, चे चिन्ह काढत असे.
Hsuan-Tsang ह्यांच्यावर चिनी भाषेत २०१६ साली ऐतिहासिक चित्रपट आला. त्यात त्यांनी मोडी ,संस्कृत ह्यांचा वापर केलेला दिसतो. तसेच मराठी चित्रपटात पत्र वाचताना त्यात मोडी ऐवजी देवनागरीचा वापर केला जातो. बॉलिवूड मध्ये बाजीराव-मस्तानी, जोधा-अकबर सारखे अनेक ऐतिहासिक चित्रपट येऊन गेले मात्र त्यात पत्रव्यवहार दाखवताना तो देवनागरीत लिहिला आहे असे दाखवले जाते.
मोडी लिपीचा प्रवास इसवी सन १३ व्या शतकापासून इसवी सनाच्या १९६० पर्यंत मोठ्या प्रमाणात चालला व त्यानंतर मोडीचा वापर पूर्णपणे नष्ट करून देवनागरी लिपी प्रचलित झाली. नंतर मोडीचा वापर थांबवला गेला. दैनंदिन आयुष्यात आपण मोडीचा वापर करत नसलो, त्याची गरज भासत नसली तरी आपल्या मातृभाषेचा ठेवा आपण जतन करावा ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
त्यासाठी अनेक प्रयत्न होताना ही दिसतात. परंतू त्याचे प्रमाण खूप कमी आहे. अलीकडे यूट्यूब वर देखील अनेक व्हिडीओ मोडीचे प्रशिक्षण देतात. पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र शासन, भारत इतिहास संशोधन मंडळ यासारखे अनेक संस्था मोडीचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून कार्य करत आहेत. अलीकडे मोडी मध्ये पुस्तके देखील लिहिली जात आहेत. तसेच कंप्यूटर साठी मोडी चे फॉण्ट ही बनवले जात आहेत पण त्या फॉण्ट मध्ये अजून काही त्रुटी आढळतात. कालांतराने ह्या त्रुटी देखील कमी होत जातील.
याचप्रकारे आपण आजही विचार करायला गेलं तर आपण कित्येक शब्द हे फारसी मधीलच वापरतो. आपल्या रोजच्या व्यवहारात फारसी, इंग्रजी भाषेचा प्रभाव झालेला आढळतो. जसे – व्यक्तीच्या नावानंतर जी लावणे, जादूगार-गुन्हेगार मध्ये गार, अर्जदार-नोकरदार, दमदार मधील दार, अक्कल – शहाणा, अखेर, अर्ज, अफवा, अस्सल, इमारत, दोन शब्दांमध्ये ‘व’ वापरणे, असे अनेक फारसी शब्द व नीट सारखा इंग्रजी शब्द असे खूप काही आपण रोजच्या जीवनात वापरतो आणि असेच आपण कायम ठेऊन आपली हि एकत्र बोलण्याची परंपरा जोपासूया.
संदर्भ
फार्सी-मराठी शब्दकोश – दत्तो वामन पोतदार
मोडी लिपी शिका सरावातून – नवीनकुमार माळी
मोडी लिप्यांतर कौशल्य – कृष्णाजी म्हात्रे
-सोज्वळ साळी (मोडी लिपी प्रशिक्षक व इतिहास संशोधक )