वास्तवाचे भान ठेवून इतिहासात रमणारी व्यक्ती म्हणजे मालोजीराव जगदाळे ,आणि म्हणुनच मालोजी इतिहासाच्या वाटेत न भरकटता ,न रेंगाळता आपला हक्काचा ऐतिहासिक ठेवा परीकीय देशातून परत आणला अवघ्या वयाच्या पंचविशीत त्यांनी ही कर्तबगारी केली .

प्रश्न : तुम्हाला इतिहासाची आवड निर्माण कशी झाली?
उत्तर :लहानपणा पासून मला ट्रेकिंगची आवड होती ,मी दहावीत असताना माझा गुरुवर्य प्रमोद मांडे सरांसोबत संपर्क आला, आणि मी ट्रेकिंग जास्त प्रमाणात करू लागलो. साधारण तीन-चार वर्षात शंभरपेक्षा मी जास्त ट्रेक्स केले , ट्रेकिंग करत असल्यामुळे शिवाजी महाराज आणि मग सहाजिकच इतिहासाची आवड निर्माण झाली. माझे शिक्षण बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स, एम. बी. ए झालेलं आहे आणि सध्या मी आयटी इंजिनीयर म्हणून एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहे.

प्रश्न : तुम्ही आयटी इंजिनिअर आहात मग सहाजिकच कामाचा व्याप जास्त असतो, मग तुम्ही वेळेचं व्यवस्थापन कसे करता?
उत्तर : मी आयटी इंजिनीयर असल्यामुळे ,माझे काम हे लॅपटॉप वर असते , त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा मला माहिती गूगल करता येते . पुस्तकं चाळता येतात ,शनिवार- रविवार वेळ देता येतो . आवड असेल तर सवड आपोआप मिळते ! आपल्या आवडी साठी दिवसभरातून रोज एक तास वेळ काढला तर आपल्याला आपली आवड जोपासता येते .एखाद्याचा जॉब हा मॅन्युफॅक्चरिंग असेल तर त्याला तितका वेळ देता येणार नाही पण माझे बैठे काम असल्यामुळे मला वेळ देता येतो .
प्रश्न : तुमच्या वैयक्तिक रेखा चित्रांच्या कलेक्शनमध्ये साधारण किती रेखाचित्रे आहेत ?
उत्तर : माझ्या कडे 19 शिवाजी महाराजांचे रेखा चित्र आहेत जे वेगवेगळ्या संग्रहालयात सुद्धा आहेत आणि दोन शिवाजी महाराजांच्या रेखाचित्र यांच्या मूळ प्रती आहेत.
त्याच बरोबर लंडन गॅझेट ह्या वृत्तपत्राची मूळप्रत आहे .
लंडन गॅझेट हे जगातला सगळ्यात जुनं वृतपत्र आहे १६६५ पासून ह्या वृत्तपत्राची सुरवात झाली ते आज पर्यंत हे वृत्तपत्र प्रकाशित केले जाते,शिवाजी महाराज ह्यांनी दुसऱ्यांदा सुरत लुटल्याचे वृत्त ह्या वृत्तपत्रात प्रकाशित आहे.प्रश्न : तुमच्याकडे असलेल्या शिवाजी महाराजांच्या रेखाचित्रां बद्दल थोडे सांगा ?
उत्तर : १) कृष्णधवल चित्र
ह्या चित्रात शिवाजी महाराज अंगावर उपरणं परिधान केलेले आणि मराठी दागिने आणि जिरेटोप परिधान केलेले दिसतात. इ. स. १६७७ दरम्यान कॉपरप्लेट इन्ग्रेविंग पद्धतीचे हे चित्र काळ्या रंगात रेखाटलेले आहे .हे चित्र शिवाजी महाराज ह्यांच्या हयातीत काढले गेलेले आहे .
हे चित्र फ्रान्स्वा वॅलेंटाइन या डच अधिकाऱ्याच्या ‘ न्यू अँड ओल्ड इंडिया’ या चौथ्या खंडाच्या दुसऱ्या भागात प्रकाशित करण्यात आले आहे.
डच शिष्टमंडळाने शिवरायांच्या भेटी दरम्यान हे चित्र रेखाटल्याची नोंद आहे.

शिवछत्रपतींच्या आयुष्यातील इ. स. १६६२ ते १६८० या कालखंडातील पराक्रमाचा आढावा घेण्यात ह्या पुस्तकात घेण्यात आला आहे.
२ ) रंगीत चित्र
घोड्यावर विराजमान असलेले हे रंगीत चित्र आहे ,जे चौथीच्या पाठ्य पुस्तकांत समाविष्ट होतं. हे चित्र १७१५ ते १७४० दरम्हेयान चित्र रेखाटले गेले आहे.

प्रश्न : रेखाचित्र शोधण्याची कल्पना मनात कुठून आली ,त्यासाठी तुम्हाला काय प्रयत्न करावे लागले ?
उत्तर : मी ‘द मॉन्युमेंटस् मेन’ हा रिअलीस्टिक हॉलिवूडपट पाहिला,तेव्हा मला युरोपातल्या खासगी संग्रहकांकडे भारतीय मिनिएचर पेंटिग्जचा मोठा संग्रह असल्याचे कळले .तेव्हा मनात विचार आला शिवरायांचे पण चित्र एखाद्या संग्रहाकांकडे असण्याची शक्यता आहे .आणि मी शोध सुरु केला . तब्बल एक -दोन वर्षे पाठपुरावा केल्या नंतर माझ्या प्रयत्नांना यश आले .
अनेक संग्रहाकांना ईमेल केले ,दोन संग्रहाकांकडून सकारत्मक उत्तर आले .
‘नेदरलँड मध्ये शोध घेत असताना मला शिवाजी महाराजांचे कृष्णधवल चित्र सापडले
या चित्रासोबत शिवछत्रपतींच्या आयुष्यातील इ. स. १६६२ ते १६८० या कालखंडातील पराक्रमाच्या नोंदी असणारी या खंडातली चार मूळ पानेही मिळाली. हे चित्र मिळणे
दुसरे चित्र मला क्रोएशियामधील झाग्रेब शहरातील लादिमीर या संग्रहाकाकडे शिवछत्रपतींचे रंगीत चित्र मला मिळाले.
यापूर्वी २०१५ साली मला लंडन येथे रॉयल कलेक्शन मध्ये असलेल्या शिवछत्रपतींच्या जगदंबा तलवारीचे एच.डी छाया चित्र मिळवण्यात यश आले होते त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला होता .
लवकरच मी माझ्या संग्रही असलेले शिवाजी महाराजांची मूळ चित्र हे कोल्हापूर इथे असलेल्या छत्रपती शाहूमहाराज संग्रहालयाला भेट देणार आहे .
प्रश्न :तुमच्या वर्ल्ड हेरिटेज प्रोजेक्ट बद्दल सांगा?
उतर : मी आणि माझा मित्र प्रज्ञेश मोळक आम्हाला २०१५ साली वाटले महाराष्ट्रातील गडकिल्ले यांचा समावेश जागतिक वारसास्थळांमध्ये व्हावा .त्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले . ह्या साठी आम्हाला डॉ. शिखाजी नाईक ह्यांनी मोलाचे सहकार्य केले .डॉ ह्यांच्या अथक प्रयत्नातून काही राजस्थान ,कांचनजुंगा येतील काही गड,किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश झालेला आहे .दुर्दैवाने काही कारणांमुळे २०१७ साली काही कारणांमुळे हे काम थांबले होते .दरम्यानच्या काळात UNESCO च्या टीमने महाराष्ट्राला भेट दिली तेव्हा एक रिपोर्ट सादर केला त्या रिपोर्ट प्रमाणे जल दूर्ग किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश होऊ शकतो असे सांगितले .नुकतेच हे प्रोजेक्ट सरकार बदलल्या हे प्रोजेक्ट सुरु होण्यासाठी शरदचंद्र पवार साहेबां कडून हिरवा कंदील मिळाला ,लॉकडाउन नंतर हे प्रोजेक्ट पुन्हा सुरु होईल .
प्रश्न : तुम्ही ऐतिहासिक डिजिटल प्लॅटफॉर्मवर कशा प्रकारे सक्रीय असता ?
उत्तर : मी माझ्या फिररस्ता ह्या युट्युब चॅनेल द्वारे मला मिळालेली माहिती इतरांसोबत शेअर करत असतो.
त्याच बरोबर दुर्गसंवर्धन आणि रिस्टोरेशन वर काम करतो.आपल्या मराठी भाषेत ऐतिहासिक लेखन हे बऱ्याच वेळा अलंकारिक भाषेत,नाट्यमय पद्धतीने लिहिलं गेलेलं आढळते ,पण मी ऐतिहासिक लेखन हे तटस्थपणे लिहिण्याचा प्रयत्न करतो ..
प्रश्न : तुमचे सध्या कोणते प्रोजेक्ट्स चालू आहेत ?
उत्तर : सध्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा यांचा समावेश जागतिक वारसास्थळांमध्ये व्हावा ह्याकडे विशेष लक्ष आहे .
मालोजीराव जगदाळे ह्यांच्या युट्युब चॅनेलची लिंक : https://www.youtube.com/firaste