डार्विनचा एक सिद्धांत आहे “survival of the fittest “ चा म्हणजे जो बलवाण असतो तोच टिकतो.
काळ बद्दला तरी आज ही बाईला स्वताच अस्तित्व टिकवण्यासाठी शारीरिक ,मानसिक आणि शाब्दिक पातळीवर आज ही लडावं लागतं.ह्या सगळयांना निर्भीडपणे लडायला शिकवते आणि पाठीशी ठामपणे उभी असते आमची अमृता मगर .सध्या ती जिजाऊ ब्रिगेडची पुणे जिल्हाध्यक्ष आहे .पण अगदी कॉलेजच्या दिवसांन पासून सामिजिक कार्य करत आली आहे .
असं कुठेतरी कानावर आलं होतं सामाजिक काम म्हटलं कि घरावर तुळशीपत्र ठेवावं लागतं पण अमृता त्याला अपवाद आहे .अमृता व्यवसायाने वकील आहे .एका कंपनी मध्ये लिगल हेड म्हणून कार्यरत आहे म्हणजे इतरां सारखीच ती पण 9 ते 5 नोकरी करते .त्यांच बरोबर जिजाऊ ब्रिगेडचं काम आणि घर सुद्धा उत्तम रित्या संभाळते .ती म्हणते “आपण वेळेचं नियोजन केलं आणि कोणतं काम मनापासून करण्याची इच्छा असली की आपण सर्व काही करू शकतो .कोणत्या ही बाईच्या हातात असतं आपण रडतं बसायचं कि कणखर बनून आपली वाट निवडायची .सगळं काही करता करता वेळ अपुरा हा पडतच असतो त्यासाठी अनेक ठिकाणी जिजाऊ कक्ष उपलब्ध आहेत .कोणती बाई ,मुलगी आपल्या पर्यंत नाही येऊ शकली तर आपण तिच्या पर्यंत पोहोचूयात ह्या उदेशाने .
अमृता ढोल छान वाजवते , तलवार बाजी ही करते.लिहिते,त्याच बरोबर चित्र ही सुंदर रेखाटते .तिचं ज्ञान ती स्वता पुरतंच मर्यादित ठेवते असं नाही, तर इतर सखींना ढोल आणि तलवार बाजीचे प्रशिक्षण ही देते .तिला अनेक पुरस्कारांनी सामन्नीत केले गेले आहे .मी अमृताला अनेक वर्षां पासून पाहत आले आहे .प्रत्येकीला अशी एक निर्भीडपणे लढ म्हणारी आणि स्फूर्ती देणारी अमृता सारखी मैत्रीण असली पाहिजे आणी प्रत्येक मुली मध्ये एक अमृता असली पाहिजे स्वाधार असणारी !