मुख़्तलिफ़ धारणा !
आपल्याला माहितच आहे कला हे व्यक्त होण्याचं उत्तम माध्यम आहे .आपल्यला छान वाटण्यासाठी ,आपल्या भाव -भावना उलगडण्यासाठी अनेक माध्यमं आपण चाचपडून बघतो .असंच कलेच्या विविध प्रकारांद्वारे काही शोधू पाहणाऱ्या विठा ह्या प्रसिद्ध नाटकात विठा ची भूमिका चांगल्या प्रकारे वठवल्यामुळे नावा रुपाला आलेल्या धारणा पंडित हिच्या मुख़्तलिफ़ ह्या कलात्मक वस्तू बनवण्याच्या छोटेखाणी व्यवसाया निमित तिच्याशी संवाद साधला .
धारणा म्हणते
“प्रत्येक व्यक्तीत एक कलाकार दडलेला असतो आपण फक्त आपल्यात लपलेली कला शोधली पाहिजे .लहानपणा पासून मला अभिनय आणी नृत्याची आवड होती .सुदैवाने मला माझे छंद जोपासण्याची संधी आणि कलेचे विविध प्रकार उलगडण्याची संधी कॉलेज मधल्या पुरुषोत्तम आणि फिरोदिया सारख्या स्पर्धांनमुळे मिळाली .कला ही माझ्यासाठी Art is thearpy.जर कला उलगडण्याकडे माझा कल नसता तर कदाचित माझं जगणं वेगळं असतं.माझं क्लिनिकल सायकॉलोजी मध्ये मास्टर्स झालं आहे ह्याचा उपयोग मला एकाग्रता ,काही क्रियेटीव्ह करण्यात आणि महत्वाचं म्हणजे माणूस म्हणून जगण्यात होतोय .मी फोटोग्राफी ,चित्रकला ,मॉडेलिंग ,डान्स,कलेच्या सर्वच माध्यमात रमत असते .मला रंगांसोबत खेळायला खूप आवडतं.
एक वर्षा पूर्वी मला मणक्याचा त्रास चालू झाला त्यामुळे मी नाटक ,नृत्य काही करू शकणार नव्हते .पण माझ्यातला कलाकार मला स्वस्थ बसून देत नव्हता मग मी पुन्हा उमेदीने उभं राहण्याचा निश्चय केला .मी घरी बसून गिफ्ट्स,म्यूरल्स,इत्यादी वस्तू तयार करत होते त्याचेच मी व्यवसायात रुपांतर केले .
मी माझ्या व्यासायाला मुख़्तलिफ़ हे नाव दिले कारण मला वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडतात .
मी रोज काही बनवते असं नाही पण जेव्हा बनवते तेव्हा त्या वस्तू किंवा कलाकृती मध्ये माझ्या भावना उतरलेल्या असतात आणि त्या मी तुमच्याकडे पाठवते ज्यामुळे माझं नातं नकळतपणे जोडलं जातं.मला वाटतं कोणत्या ही कलाकाराने मनापासून केलेल्या कलेची किमंत होऊच शकत नाही ,पण कमीत कमी प्रत्येकाने त्याचा आदर नक्कीच करायला हवा .मी Take Risk, Explore ,Learn Improve, Try to Get a Better and Be a Genuine person” than what you were yesterday.
हे तत्त्व फॉल्लो करते .
तुम्ही माणूस म्हणून चांगले असला की कलाकार म्हणून पण उत्तम घडत जाता . आता माझा स्वताचा व्यवसाय आहे त्याच बरोबर मी स्टेज आणि स्क्रीनवर ही काम करू शकणार आहे ह्याचा मला आनंद आहे .

Related Posts