चित्र आणि शिल्पकलेचे डॉक्टर ,डॉ ,गुरुगोविंद आंबे.

 

 

शब्दातून जे मांडता येत नाही ते कधी कधी चित्रातून व्यक्त करता येत. प्रत्येक चित्र, शिल्प एक  कविताच असते पण तरीही आपल्याकडे चित्र आणि शिल्पांना वाचण्याची साक्षरता अजून फार प्रमाणात झालेली दिसत नाही. ही साक्षरता वाढावी म्हणून विशेष काम करणारे चित्रकलेचे आणि शिल्पकलेचे  डॉक्टर डॉ. जी. एन. आंबे ह्यांची खास घेतलेली मुलाखत.  ते त्यांच्या प्रवासाचं वर्णन करताना आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्ती बद्दल कृतज्ञता व्यक्त करताना विसरत नाहीत. अगदी एखादा पेंटिंग मधला टिंबाच्या अस्तित्व पण महत्वाचा असतं अगदी तसचं ते आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीला महत्व देतात प्रश्न : थोडं तुमच्या बालपणा विषयी सांगा ?
उत्तर : माझं मूळ आजोळ बार्शी ,माळे गल्लीत मिरजकर वाडा . माझे वडील डॉक्टर असल्यामुळे मराठवाड्यातील माकणी व परिसरातील गावात ह्या खेडेगावी तेथे तेव्हा आरोग्य सुरक्षा सुविधा नव्हती. तेथील गावच्या श्री तात्या पाटील व ग्रामस्थांच्या अग्रहावरुन तेथे वडिल लोकआरोग्य सेवेसाठी राहिले आणि मी माकणीत लहानाचा मोठा झालो .माकणी हे तसं तेव्हा मागास गाव,तिथे प्रवासासाठी वाहनांची सोय नव्हती.बैलगाडीनेच प्रवास .नंतर फार तर फार सकाळी एक बस आणि संध्याकाळी एक बस असायची .
गाव खुपच समृद्ध नी सुबत्त .तेरणेनदीच्या कुशीत , राजमहाली वेस व गावाला तटबंंदी होती.टूमदार पण सुंदर.

प्रश्न : चित्रकलेची आवड कशी निर्माण झाली ?

उत्तर : कदाचित माझे शिवामामा हे त्याकाळी चित्रे छान काढायचे , बालपणी त्यांचा प्रभाव माझ्यावर राहिला आहे .तसेच चित्र काढणे हे माझ्यात उपजत होते .माझ्या आठवणीत माझ्या आजोळी माझे वडिलांचे मित्र श्री वैद्य काका होते ते अक्कलकोट स्वामींचे शिष्य होते त्यांनी मला मी साधारण ३ -४ वर्षाचा असताना मला लहानपणी एक ब्रश व रांगोतळीचे पुस्तक भेट दिले होता त्यांने मी आवडीने चित्र काढू लागलो. माकणीत लहानपणापासून मी सणावाराला श्रावणात गुंफ्यात पांढऱ्या भिंतीवर कावाने काडीला कापूस गुंडाळून त्या ब्रशने ओम नमः शिवाय । ; हनूमान जयंतीला हनूमानाचे चित्र काढत .
आणि चित्र काढायचो. रथ सप्तमीला गावातील महिला मला पाट्यावर चंदन उगाळून द्याच्या त्या चंदनाने मी सूर्यनारायणाचे चित्र रेखाटायचो असे मला आठवते .
गावातील लातूरे पेंटर होते.त्यांचे लाकडी रंगीत खेळणी करण ,भितींवरील नक्षी चित्र पहात लहानाचा मोठा झालो.

प्रश्न :तुमच्या माकणी ते पुणे ह्या प्रवासा विषयी सांगा ?

उत्तर :दहावीनंतर मी सोलापूरला चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण घेतले दोन वर्षाचा पूर्वी चित्रकलेकडे जायचं असेल तर एक वर्षाचा चित्रकलेचा फाउंडेशन कोर्स होता ,तो मी केला आणि दुसरा आर्ट टीचर्स डिप्लोमा केला .तेथे प्रथम आलो.प्राचार्य श्री देवर कोंडा सर , सध्याचे प्रसिद्ध हास्य सम्राट श्री. दिपक देशपांडे सर ,श्री.राणे सर आणि श्री. डोंगेस यांच बहूमोल मार्गदर्शनाने यशस्वी होत गेलो.मला आठवतं तिथे देखील मला भरपूर बक्षिसे मिळालीत.श्री एस पी बालसुब्रमण्यम यांच्या हस्ते मला एक बक्षीस मिळालं होतं .

प्रश्न : तुम्ही व्यंगचित्र ,चित्रकला ,शिल्पकला बरीच कलेच्या विविध अंग हाताळले आहेत त्या विषयी थोडे.

अलीकडेच पिंपरी-चिंचवड मधील भिम-सृष्टी साकारलेले आहे त्या प्रकल्प कार्यात तज्ञ म्हणून महत्वच कार्य करता आलं.

माळीण गावचे पुनर्वसन होताना तेथे देखील स्थानिक चित्रकारांना घेऊन अनेक चित्रे रेखाटली .सोलापूरला असताना मी टेकस्टाईल साठी लागणारे ब्लॉक डिसाईन ही बनवून पाहिले आहे.

एकदा गंमत म्हणून व्यंगचित्र असलेली पत्रिका एकाला बनवून दिली होती.

देशातील पहिले ,दुसरे ,तिसरे राज्यास्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे उत्कृष्ट मुखपृष्ठ कार्याबद्दल तीन वेळा पुरस्कार प्राप्त झाला आहे .

प्रश्न : कोणता प्रकार आणखी हाताळायची तुमची इच्छा आहे ?

उत्तर : मला नोटांवर डिसाईन काढायला आवडेल .

प्रश्न :आयुष्याला कुठेतरी एक दुखाची किनार असते असा एक अनुभव सांगा.

उत्तर : 1997 साली पांचगणीला आपण एक अंतराष्ट्रीय आर्ट कॉलेज उभारावं असं वाटलं होतं ,मी कॉलेज स्थापन करण्याची तयारी चालू केली होती .

1999 साली कॉलेजला शासनमान्यता मिळाली होती एक स्वप्न पूर्ण होणार होतं पण अचानक आदल्या दिवशी माझा पुण्यातील सेनापती बापट रोडला एक्सीडेंट झाला काही तास मी कोमात गेलो होतो माझा हात फ्रॅक्चर झाले होते.

त्यामुळे मधल्या काळात माझे सर्व काम बंद होते आणि हे स्वप्न बाजूलाच पडलं त्याकाळात मला

आ.श्रीमती सिंधुताई जोशी आणि आ.श्रीमती अनुताई भागवत ह्यांनी मला धीर दिला आपण अपंग झालो म्हणून मागे वळून बघायचं नसतं असा त्यांनी

मला धीर दिला. आणि मग आणि मग मी पुन्हा उभारी ने कामाला लागलो.

२०१८ साली डॉ जि.एन .आंबे आर्ट फौंडेशनची स्थापना झाली त्या अंतर्गत अनेक उपक्रम राबवले जातात .

प्रश्न : पीएचडी ची कल्पना कशी आली डोक्यात?

उतर : वडील डॉक्टर असल्यामुळे सगळ्यांना वाटायचं मी डॉक्टर झालो पाहिजे ..सगळ्याचं स्वप्न पूर्ण न करता आल्याची खंत मनात होती चित्रकला तसा दुर्लक्षित विषय आहे म्हणून मी विचार केला चला आपण चित्र, शिल्पकलेचे डॉक्टर होऊयात. पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दुर्दैवाने आज पर्यंत कोणीच शिल्पकलेत पिएचडी केलेली नाही म्हणून

लाल रंगाच्या विविध छटा

पुणे युनिव्हर्सिटी मध्ये माझे सिनोपसेस सादर झाले आहे.पण आर .आर. कमिटी माझ्या विषयासाठी घेतली जात नाही….मला गाईड ही नसल्याकारणाने पिएचडी पुर्ण होण्यास खुपच ऊशीर होत आहे.पण मला विश्वकर्मा विश्व विद्यापिठाने मला फाईन आर्टस् ‌ मध्ये पीएचडी ने सन्मानित केलं गेलं .

चित्र,शिल्प कलेसाठी व्यासपीठ आहे पण त्याची साक्षरता कमी त्यामुळे कौशल्य विकास शिक्षण प्रशिक्षण खुपच कमी आहे,

त्यामुळे अभिजात चित्रकला ह्याला कुठे अजून व्यासपीठ नाही . ही शोकांतिका म्हणता येईल .

प्रश्न : एक असा प्रसंग सांगा  जेव्हा तुम्ही भारावून गेला होता.
उत्तरः माझ्या माकणीतील बाल मित्रांनी मला त्यांचे विविध कला, खेळातील त्यांना मिळालेले पुरस्कार मला शालेय वार्षिक पुरस्कार कार्यक्रमात मुख्याध्यापकांच्या हस्ते दिले तो क्षण. माझे मित्र मंडळी आणी सर्वांचे प्रेम ह्या सगळ्यानेच मी भारावून जात असतो .
राज्य सत्कार ,भारत सरकार पुरस्कारानी सन्मानित . २०१५ साली सिंगापूर इथे माझ्या चित्रांचं “जीवन जीनेकी कला… अतर राष्ट्रीय सोलो चित्र,शिल्प प्रदर्शन .” भरण्यात आलं होतं.
अंरराष्ट्रीय चित्र,शिल्प सलो प्रदर्शनाच व विविध अंतर राष्ट्रीय कलाकारांसोबत विविध कला प्रकल्पकरण्याच स्वप्न पूर्ण करायचे प्रयत्न करत आहेत.

दिव्यांग विषेश व्यक्तीसाठी चित्र शिल्प यातून पुनर्वसन व समाज मुख्यप्रवाहात आणण्याच अत्यंत अवश्यक कर्य चालूच आहे.

२०१६ साली भारत भेटी दरम्यान ६० वर्षिय जपानी चित्रकार सकाता ह्यांनी माझी आवर्जून भेट घेतली होती आणि जापानी भाषेत काहीतरी लिहून दिलं होतं.आम्हाला एक मेकांची भाषा कळत नसली ,तरी कले विषयी असणारं सकातांच प्रेम पाहून मी भारावून गेलो होतो .
सध्या इंटेरिअर व आउटडोर बिल्डिंग प्रकल्पामधे…. आर्किटेक्ट ,इंटेरिअर ,ओनर यासोबत… चित्र , शिल्पांचे विषेश प्रोजेक्ट करण्याच काम सूरु आहे.
सर्वसामान्य जनात चित्र , शिल्प रसस्वाद… वाचन,आवड रुजवण्याच ,जनजागृतीच कार्य चालूच आहे.

मुलाखतकार :श्रद्धा जगदाळे

Related Posts