आज महिला दिनाच्या निमित्ताने मला धृती चॅटर्जी ह्यांची मुलाखत प्रकाशित करताना विशेष आनंद होत आहे .
धृती चॅटर्जी ह्या डीसी व्हिजनच्या संस्थापिका आहेत.
त्या यशस्वी उद्योजिका आहेतच पण त्याच बरोबर व्हीआर स्टोरीटेलर सुद्धा आहेत .त्याच बरोबर त्यांनी सायबर सायकोलॉजी शिक्षण घेतलेले आहे. त्यांचे काम टेक्नोलॉजी आणि कला ह्यांचा संगम आहेत.

प्रश्न :आयटी मधली नोकरी सोडून तुम्हाला उद्योजक का बनावे वाटले ? हा बदल कसा झाला ?
उत्तर : लहानपणा पासून मला वेगवेगळ्या गोष्टी करण्याची आवड असायची, जे इतर लोकं करायचे त्या पेक्षा मी वेगळं करायचे.जेव्हा मी शिक्षण घेत होते तेव्हा हार्डवेअर आणि नेटवर्किंग करणारी मी एकटी मुलगी होते.
माझा आय.टीचा प्रवास हा २००४ साली झाला. 7 वर्षे मी हार्डवेअर आणि नेटवर्किंग मध्ये काम केल्यावर, मी admin झाले. पण कामात तोच तोचपणा येऊ लागला.म्हणून मी समाधानी नव्हते. मला असे वाटू लागले मी स्वत: साठी आणि समाजासाठी काहीच करत नाहीये म्हणून २००९ साली मी आणि मित्र परिवाराने Didactics IT Solutions (DISL). ही कंपनी स्थापण केली .
१९ वर्षे आम्ही आयटी मध्ये कार्यरत आहोत .Didactics आज आयटी मध्ये नावाजलेला ब्रांड आहे.

तुमचे छंद कोणते ?
उत्तर : मला साहसी खेळ आवडतात, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायला आवडतं,पुस्तकं वाचायला आवडतात म्हणून मी एक बोईटेक नावाचे कॅफे कम बुक स्टोर कोलकाता मध्ये सुरु केले आहे .
प्रश्न:तुम्हाला सायबर सायकोलॉजी का शिकावं असं वाटलं ?आणि तुम्ही व्ही. आर स्टोरी टेलर कशा झाला ?
उत्तर : मला नेहमीच नवीन गोष्टी शिकायला आवडतात ,मी सायबर सायकोलॉजी आवडीतून शिकले.मग मला लक्षात आले की सायबर सायकोलॉजीमुळे आपले जीवन अधिक चांगले बनवू शकते.
या युगात सायबर सायकोलॉजी खूप उपयुक्त आहे. विशेषत: कोविड लॉकडाउन दरम्यान, सायबर सायकोलॉजी उपयुक्त ठरली. प्रत्येकजण घरी बसलेला होता, त्यांच्या मित्राच्या मंडळीं पासून अलिप्त होता. म्हणून बरेच लोक नैराश्याने, चिंतेने ग्रासलेला होता. जेव्हा मी व्ही.आर उत्पादने विकसित करीत होते तेव्हा मला सायबर सायकोलॉजीची खूप मदत झाली.
2016 च्या शेवटी, माझी श्री. मुखर्जीं सोबत भेट झाली , ते मकावचे आहेत.त्यांनी मला मला Virtual reality विषयी सांगितले. मला त्याबद्दल फार माहिती नव्हती.
आश्चर्य म्हणजे व्हीआर बॉक्स मला पूर्वी गिफ्ट म्हणून मिळाले होते . व्हीआर बॉक्स कसे काम करते हे मला माहित नव्हते.
जसे मी तुम्हाला सांगितले आहे मला वाचणाची आवडत आहे , मला चित्र काढायला आवडते , माझा मेंदू खूप सर्जनशील आहे.
श्री. मुखर्जींनी ह्यांनी व्ही.आर. व्हिडिओ, कथा दाखवल्या, हळूहळू मी व्हीआरमध्ये रस वाटू लागला. मी लंडन विद्यापीठातून व्हीआर मध्ये प्रमाणपत्रही मिळवले आहे
मला वाटले की ही भारता मध्ये व्ही.आरचा एकत्रित प्रसार करू शकतो.
२०१९ साली श्री. मुखर्जी ह्यांच्या समवेत मला World XR conference in China 2019. इथे निमंत्रित करण्यात आले होते.
तिथे मला आढळले की चीनमधील पाचवीतील मुले वर्ल्ड एक्सआर प्रदर्शनात व्हीआर स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत मला वाटले. भारतातील तरुण व मुलांनाही काही संधी व ज्ञान मिळायला हवे आणि मी माझा तिसरा उपक्रम डीसी व्हिजन ह्या कंपनीची स्थापना केली .जी व्ही.आर ट्रेनींग देईल.
मला वाटते तंत्रज्ञान आणि मार्केटिंग ह्या दोन्ही गोष्टीची चांगली जाणीव असली पाहिजे. माणासाला आपले ज्ञान वाटता आले पाहिजे.म्हणून आम्ही ज्ञान तर देतोच पण कसं विकायचं हे ही शिकवतो. आम्ही सिस्टीम ऑफर करतो, फक्त कोर्सेस नाही.
मी ज्या समस्यांना तोंड दिले त्या समस्यांना माझ्या विद्यार्थ्यांनी तोंड देऊ नये असे मला वाटते.
सध्या आम्ही पर्यटन, रिअल इस्टेट,शॉर्ट व्हर्च्युअल रिअलिटी फिल्म शूटच्या प्रकल्पांवर काम करत आहोत.
जेव्हा व्हीआर हा शब्द कानी पडतो तेव्हा गेमिंग लगेच आठवतं, परंतु गेमिंग हा आपल्या समाजातील, तरुण पिढीसाठी एक व्यसन आहे, यामुळे एक हार्मोनल असंतुलन निर्माण होते,शरीरात ऑक्सिटोसिनचे प्रमाण हळूहळू कमी होते. विशेषत: जेव्हा आपण पुन्हा पुन्हा पुन्हा एकच गोष्ट करत असू .
लॉकडाउनच्या काळात आम्हाला हिकीकोमोरी नावाचा सिंड्रोम आढळला, प्रथम जपानमध्ये मध्ये आढळा.
माणसं एका खोलीत एकमेकांसोबत बोलत नाहीत पण व्हर्च्युअली माणसांसोबत बोलतात , सिनेमा बघतात ,पण ज्यावेळेस आजुबाजू खरा माणूस समोर येतो, तेव्हा ते एकदम गोंधळतात . ह्याचे प्रमाण तरुण पिढी मध्ये वाढत चालेलं आहे.जर हे तुमच्या सोबत होत असेल तर कि आपल्या रसायनांमध्ये काही समस्या आहेत आणि आपण इतर मनुष्यांप्रमाणे जीवन जगले पाहिजे.त्यासाठी इतर माणसांसोबत बोलले पाहिजे .असे मानसिक आजार व्ही.आर ने बरे होऊ शकतात हे
आमच्या लक्षात आले आणि व्ही.आरचा वापर फिजिओथेरपीमध्ये केला कि फरक पडू शकतो जगातील एक मोठी लोकसंख्या चिंता, वेगवेगळ्या भीतीने ग्रस्त आहे . कोविडनंतर, ही संख्या अचानक वाढली आहे. आपल्याकडे पारंपारिक उपचार आहेत,परंतु बहुतेकवेळा , रुग्ण औषधे घेयला नकार देतात आणि वेदनांचा सामना करण्याची भीती वाटते, या रूग्णांवर व्हर्च्युअल रियलिटी थेरपी (व्हीआरटी) चा उपचार केला जाऊ शकतो. जसं: व्हीआर सिम्युलेशन, नायक्टॉफोबिया (अंधाराची भीती), अक्रोफोबिया (हाइट्सची भीती), ओसीडी (ओबेशिव्ह-कंपल्सिव डिसऑर्डर), पीटीएसडी (पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर) इत्यादीसारख्या समस्यांमुळे ग्रस्त रूग्णांसाठी डिझाइन केलेली आहेत. 1000 पेक्षा जास्त नमुन्यांवर कसून संशोधन केले आणि या सोल्यूशन्सची रचना करण्यापूर्वी अनेक मानसशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घेतला. सायबर सायकोलॉजिस्ट डॉ. राकेश कृपलानी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आर.के.सायकोथेरपीच्या सहकार्याने हा प्रकल्प करीत आहोत.
“प्रथमा ” नावाचा प्रकल्प सुरू करण्याचा माझा मानस आहे,ह्या अंतर्गत तरुण मुली आणि महिलांना प्रशिक्षण देणे तसेच वर्च्युअल प्लॅटफॉर्मवरुन त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी पोहोचण्यासाठी या उपक्रमासाठी आम्हाला शासनाचे सहकार्य आवश्यक आहे.

तुमच्या यशाचे रहस्य काय ?
लोकं काय म्हणतील हा विचार मी करत नाही ,मला जे आवडत ते मी करते आणि त्यात सातत्य ठेवते.मी निर्णय पटकन घेते.