आज मी, शेखर बापू रणखांबे यांच्या सिनेमाच्या क्षेत्रातील प्रवास येथे तुमच्यासमोर मांडत आहे. मी त्यांची कहाणी निवडली कारण त्यात अनेक फिल्ममेकर्सच्या संघर्षाच्या गोष्टींचे तुकडे सापडले .

आज मी, शेखर बापू रणखांबे यांच्या सिनेमाच्या क्षेत्रातील प्रवास येथे तुमच्यासमोर मांडत आहे. मी त्यांची कहाणी निवडली कारण त्यात अनेक फिल्ममेकर्सच्या संघर्षाच्या गोष्टींचे तुकडे सापडले .
इंद्रायणीच्या खळखळणाऱ्या पाण्याच्या आवाजाने माहितीपटाची सुरवात होते, ज्ञानोबा-तुकारामचा जयघोष, मंदिरातली आरती ऐकू येते आणि हळू हळू जत्रेचे स्वरूप असलेली गर्दी, त्या गर्दीतले वेगवेगळे आवाज आणि त्याच गर्दीत खेळण्याच्या उघड्या दुकानात निवांत बसलेल्या शांता आज्जी आपल्या आयुष्याची थोडक्यात गोष्ट सांगू लागतात.